• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखांची अशी घ्या काळजी, रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ खास उपाय

March 6, 2026 by admin Leave a Comment


आपल्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखांची योग्य निगा राखणे महत्वाचे आहे. कारण तुमच्या लुकसोबतच हातांच सौंदर्य वाढवण्यास नखं मदत करतात. त्यामुळे काही महिलांना लांब नखं आवडतात. मात्र अनेकांची तक्रार अशी असते की नखं वाढताच तुटतात आणि लवकर नखं वाढत नाही. जर तुमचीही हीच समस्या असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला काही टिप्स वापराव्या लागतील. ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांच्या मदतीने नखं आणि हातांचं सौंदर्य खुलवू शकता.

जर तुमची नखं वाढताच तुटत असतील तर काळजी करू नका. नखं सुंदर आणि मजबुत करण्यासाठी फक्त रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते. चला तर मग आजच्या लेखात आपण नखांची योग्य काळजी घेण्याची आणि कोणते घरगूती उपाय आहेत ते जाणून घेऊयात.

नखे वारंवार का तुटतात?

कमकुवत नखांची अनेक कारणे असू शकतात, जसे की बायोटिन, लोह, प्रथिने किंवा कॅल्शियमची कमतरता. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नखं कमकुवत होऊ शकतात आणि वारंवार तुटू शकतात. शिवाय, पाणी, डिटर्जंट किंवा केमिकलच्या वारंवार संपर्कात राहिल्याने देखील नखं कमकुवत होतात. एवढेच नाहीतर शरीरातील हार्मोनल बदल, थायरॉईड समस्या किंवा नेल पॉलिश आणि रिमूव्हरचा वारंवार वापर देखील नखांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो.

या टिप्स नखांचं सौंदर्य खुलवतील

नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा

झोपण्यापूर्वी तुमच्या नखांना आणि क्युटिकल्सना कोमट खोबरेल तेल लावा आणि 5-10 मिनिटे मालिश करा. नारळाच्या तेलातील पोषक तत्वे नखांना आतून मजबूत करतात आणि कोरडेपणा दूर करतात. नियमित मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे नखांची वाढ जलद होण्यास मदत होते.

बदाम तेल किंवा व्हिटॅमिन ई तेल

तुमची नखं जर थोडेसे वाढताच तुटत असतील तर व्हिटॅमिन ई तेल किंवा बदाम तेल लावणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे नखांना पोषण मिळते आणि ते जाड आणि मजबूत होण्यास मदत होते. तेलाने मालिश करून रात्रभर तसेच राहू द्या जेणेकरून पोषक तत्वे योग्यरित्या शोषली जातील.

कोरफड जेल देखील प्रभावी आहे

कोरफडीचे जेल नखांना हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. झोपण्या आधी तुमच्या नखांना थोडेसे ताजे कोरफडी जेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुमची नखं हायड्रेटेड राहण्यास मदत होते, तुटणे कमी होते आणि त्यांची नैसर्गिक चमक आणि वाढ हळूहळू सुधारते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in