• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हाडापर्यंत गळते मांस, नंतर मृत्यू…युद्धात इस्राईलवर लागला हे भयंकर अस्र वापरल्याचा आरोप

March 9, 2026 by admin Leave a Comment


युद्धात सर्वकाही क्षम्य असते असे म्हटले जाते. मध्य पूर्वेतील युद्धात हा प्रश्न इस्राईल आणि त्यांच्या सैन्याला विचारला जात आहे. याचे कारण मानवाधिकार संघटना ह्युमन राईट्स वॉचने सोमवारी ९ मार्च रोजी एका रिपोर्टमध्ये आरोप केला आहे. इस्राईल सैन्याने बेकायदेशीरपणे दक्षिण लेबनॉनच्या एका गावावर पांढऱ्या फॉस्फोरस वाल्या तोफगोळ्याने मारा केल्याचा आरोप इस्राईलवर होत आहे. सफेद फॉस्फोरसवर का बंदी आहे, काय आहे या मागचे कारण वाचूयात…

इस्राईलवर काय नेमका आरोप ?

जिओलोकेटिंग आणि सात फोटोंची पडताळणी केल्यानंतर ह्युमन राईट्स वॉचने हा आरोप केला आहे. इस्राईलने दक्षिण लेबनॉन गाव योहमोरच्या निवासी क्षेत्रात तोफखान्याचा वापर करुन सफेद फॉस्फोरस डागल्याचा आरोप या मानवअधिकार संघटनेने केला आहे. हा हल्ला इस्राईली सैन्याने लेबनॉनच्या डझनावारी गावातल्या निवासी लोकांना हे गाव खाली करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासांनी येथे हा हल्ला करण्यात आला.

याआधी लेबनॉनच्या सरकारी न्यूज एजन्सीने रविवारी म्हटले की इस्राईली सैन्याने तोफ गोळे आणि फॉस्फोरस गोळे डागले. इस्राईली सीमेजवळ खियाम आणि ताल नाहास शहरांना टार्गेट केले गेले. गेल्या महिन्यात देखील लेबनॉनने इस्राईलवर दोघांना लागून असलेल्या सीमेच्या लेबनॉनी भागावर हर्बिसाईड ग्लायफोसेटचा मारा करण्याचा आरोप ठेवला होता. राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी यास पर्यावरणाच्या विरोधातील गुन्हा म्हणत याची कठोर शब्दात टीका केली होती.

इस्राईलने २०२४ च्या युद्धविरामानंतरही हेजबोल्लाहला टार्गेट करत लेबनॉनवर हल्ले जारी ठेवले आहेत. त्याने इस्राईलळी युद्ध सुरु झाल्यानंतर गेल्या आठवड्यात लेबनॉनवर अनेक हल्ले केले आहेत आणि इराण समर्थित समूह हेजबोल्लाहवर हल्ले केल्यानंतर सीमावर्ती क्षेत्रात जमीनी सैन्य पाठवले होते.

माणूस जगू शकत नाही

युद्धात पांढऱ्या फॉस्फोरसच्या वापरावर बंदी आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा वायूच्या वापरावर बंदी आहे.फॉस्फरस एक असे रासायनिक घटक आहे जो ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर पेटतो. याचा वापर स्मोकस्क्रीन ( धुराची भिंत ) तयार करण्यासाठी आणि युद्धक्षेत्रात प्रकाश पसरण्यासाठी केला जातो. मात्र, जेव्हा याचा वापर शस्र म्हणून केला जातो तेव्हा तो घातक असतो. इमारतींना आगी लावण्यापासून ते मानवाला हाडापर्यंत जाळू शकतो. या हल्ल्यातून जरी माणूस वाचला तरी संक्रमण आणि अवयव किंवा श्वसन विफलतेचा धोका असतो. मग भलेही त्या जखमा छोट्या असल्या तरी माणूस जगू शकत नाही.

केवळ स्मोक स्क्रीनसाठी

इस्राईल सैनिकांद्वारे पांढऱ्या फॉस्फोरसचा वापर बेकायदेशीरपणे केला आहे. हे खूपच चिंताजनक असून नागरिकांवर गंभीर परिणाम होणार आहेत असे एपीच्या बातमीत ह्युमन राईट्स वॉचचे लेबनॉनी रिसर्चर रामजी कॅस यांनी म्हटले आहे. यावर इस्राईलच्या सैन्याने काही उत्तर दिलेले नाही, मात्र, मागे इस्राईलने आपण पांढरा फॉस्फरसचा वापर केवळ स्मोक स्क्रीनसाठी करतो नागरिकांना टार्गेट करण्यासाठी करत नसल्याचे म्हटले होते.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in