• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हरीश राणा यांना अखेर ‘दयामरण’, एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

March 24, 2026 by admin Leave a Comment


भारतातील कोर्टाकडून दयामरणाची मंजूरी मिळालेली पहिली व्यक्ती ठरलेल्या हरीश राणा यांनी मंगळवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ( AIIMS ) मध्ये शेवटचा श्वास घेतला. भारतात निष्क्रीय इच्छामृत्यू ( पॅसिव्ह युथेनेशिया ) ची मंजूरी मिळणारी ते पहिली व्यक्ती होते. साल २०१३ पासून ते कोमात होते आणि गेल्या १३ वर्षांपासून लाईफ सपोर्ट सिस्टीमच्या आधारे त्यांच्यावर उपचार सुरु होते. ३१ वर्षीय हरिश राणा यांना १४ मार्च रोजी गाझियाबाद येथील त्यांच्या घरातून दिल्लीच्या डॉ.बी.आर.आंबेडकर इन्स्टिट्युट रोटरी कँसर हॉस्पिटलच्या पेलिएटिव्ह केअरच्या युनिटमध्ये भरती केले होते. याच्या तीन दिवसाआधी ११ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयाद्वारे त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या मुलाच्या इच्छामृत्यूला मंजूरी दिली होती.

२०१३ मध्ये चौथ्या मजल्यावरुन कोसळले –

हरिश राणा पंजाब युनिव्हर्सिटीतील बीटेकचे विद्यार्थी होते. साल २०१३ मध्ये चौथ्या मजल्यावरुन कोसळल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यानंतर ते कोमात गेले होते. या दरम्यान त्यांना कृत्रिम न्यूट्रिशनल आणि मध्ये- मध्ये ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला होता.

रुग्णालयात भरती झाल्यानंतर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांचा न्युट्रिशनल सपोर्टला हळूहळू कमी करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने AIIMS ला निर्देश दिले होते की लाईफ सपोर्ट सिस्टीमला एक नियोजित योजनेनुसार काढण्यात आले.त्यामुळे रुग्णाचा यथायोग्य मान राखला जाईल याची काळजी घेतली गेली.

दिल्ली एम्सच्या माजी ऑन्को-एनेस्थिशिया प्रमुख डॉ. सुषमा भटनागर यांनी सांगितले की या प्रक्रियेत रुग्णाला देण्यात येणारे पोषण हळूहळू कमी करण्यात आले किंवा बंद करण्यात आले. रुग्णाला कोणत्याही प्रकारची वेदना होऊ नये याची काळजी घेण्यात आली. यासाठी त्यांना वेदनाशामक औषधे दिली जात होती. त्यामुळे रुग्णला कोणतीही वेदना होऊ नये याची काळजी घेतली. भारतात या प्रकारचे हे पहिलेच प्रकरण मानले जात आहे. ज्यामुळे दयामरण वा इच्छामरण या विषयावर चर्चेला सुरुवात झाली आहे.

हरिश राणाचा भावनिक व्हिडीओ व्हायरल –

एम्सला नेण्याच्या आधी हरीश राणा यांचा गाझियाबाद येथील घरातील भावनिक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे लोक भावनिक झाले होते. या व्हिडीओत ब्रह्माकुमारी संस्थेची एक महिला सदस्य त्यांच्या माथ्याला टीळा लावताना दिसत आहे. शांत स्वरात ती त्यांना सांगते की सर्वांना क्षमा करत आणि सर्वांची माफी मागत आता शांततेने आराम करावा. या दृश्याला पाहून अनेकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या….

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO
  • दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in