
दापोली मतदार संघाला ५० वर्षांनी मंत्री पद मिळालेले आहे. पन्नास वर्षांची उणीव काही पाच वर्षात भरुन काढता येत नाहीत. त्यासाठी ज्याकाही कारगर योजना आहेत.त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. आपण हट्ट केला असता तर आपल्याला कबिनेट मंत्री पद देखील मिळाले असते. मात्र,मला माहिती होते की कॅबिनेट मंत्री पद मागितले की तर एकच मिळत आणि कुठले खाते मिळाले असते हे सांगता येत नाही. पण राज्यमंत्री पद आले तर चांगली खाती आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे अनेक खात्याचा पदभार सांभाळायला मिळाला आहे. राज्यमंत्री पदातून बरेच काही कोकणासाठी करता येणार आहे असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे.
Leave a Reply