
प्रत्येकजण आपल्या आरोग्याची त्यासोबतच चेहऱ्यांची व केसांची काळजी घेत असतात. पण अनेकदा यासर्वांमध्ये आपण आपल्या पायांची काळजी घ्यायला विसरतो. दिवसभरातील धुळ, उन्हामुळे आणि मृत त्वचेमुळे आपल्या पायांचा रंग हळूहळू फिकट होतो. त्यामुळे पायांची अवस्था खूप वाईट झालेली असते. तर यावर उपाय म्हणून आपण पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करतो. पण तुम्हाला वेळे अभावी पार्लरला जायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने स्वयंपाकघरात असलेल्या गोष्टी पासून फुटमास्क बनवू शकता. त्यात हा मास्क घरगुती पद्धतीने बनवल्याने तुम्हाला रातोरात तुमच्या पायांच्या त्वचेत स्पष्टपणे फरक पाहायला मिळतो. चला तर मग आजच्या लेखात आपण घरगुती पेडिक्युअर कसे करायचे ते जाणून घेऊयात.
तुमच्या स्वयंपाकघरातील या गोष्टींनी बनवा घरगुती फूटमास्क
ऊन, धूळ आणि मृत त्वचेमुळे तुमचे पाय निस्तेज झाले असतील किंवा त्यांचा मऊपणा नाहीसा झाला असेल, तर महागड्या पेडिक्युअर ऐवजी हा उपाय करून पहा. यासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ किंवा तांदळाचे पीठ, लिंबू, खोबरेल तेल, दही आणि कोणताही शाम्पू किंवा बॉडी वॉश इत्यादी गोष्टी लागतील.
तांदूळ तुमच्या पायांना देईल चमक
या घरगुती उपायासाठी प्रथम थोडे तांदूळ घेऊन मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करा. तुमच्याकडे तांदळाचे पीठ असल्यास, ही मेहनत करण्याची गरज नाही. आता, एका भांड्यात आवश्यक तेवढी तांदळाची पूड घ्या, त्यात अर्धे लिंबू, एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा घट्ट दही मिक्स करा. त्यानंतर या पेस्ट मध्ये तुम्ही तुमचा कोणताही आवडता शॅम्पू किंवा बॉडी वॉश मिक्स करू शकता. शक्यतो सौम्य शॅम्पू वापरा. आता एक गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत सर्व मिश्रण एकत्र चांगले. मिक्स करा.
हा घरगुती फूट मास्क कसा वापरावा
सर्वप्रथम पाय स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवा. टॉवेलने पाय हलकेच पुसून घ्या. आता तयार केलेली पेस्ट घेऊन पायांना लावा. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी सुमारे 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. सुमारे 20 मिनिटे हा फुटमास्क पायांवर तसाच राहू द्या, त्यानंतर पाय धुवा. यानंतर तुम्ही पायांना कोणतेही तेल किंवा लोशन लावू शकता.
हा नैसर्गिक स्क्रब/मास्क पायांसाठी आहे फायदेशीर
तांदळाचे पीठ नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. त्याचे बारीक कण मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी दिसते. दही आणि लिंबू देखील टॅनिंग कमी करण्यास आणि रंग सुधारण्यास मदत करतात. नारळाचे तेल पायांना खोलवर मॉइश्चराइझ करून त्यांचा मऊपणा टिकवून ठेवते.
Leave a Reply