• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट?

February 7, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा धु्व्वा उडवला. कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीसमोर विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं होतं. खरं तर हे आव्हान खूपच कठीण होतं. पण कर्णधार स्मृती मंधाने धैर्याने सामना करत विजयश्री खेचून आणला. स्मृतीने या सामन्यात 41 चेंडूत 87 धावांची खेळी केली. त्यामुळे या विजयासाठी तिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. सर्व काही कर्णधार स्मृती आणि आरसीबी संघाच्या मनासारखं झालं. मग कुटुंबिय या विजयाच्या आनंदात मागे कसे राहतील. स्मृती मंधानाच्या आईने एक मीम इंस्टाग्रामवर रिपोस्ट केलं होतं. त्यामुळे स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर खूपच चर्चा होऊ लागल्याने अखेर स्मृतीच्या आईने पोस्ट डिलिट केली.

स्मृती मंधानाच्या आईने नेमकं काय पोस्ट केलं होतं?

स्मृती मंधानाच्या आईल पोस्ट डिलिट केली खरी पण नेटकऱ्यांना त्यात काय लिहिलं होतं ते माहिती आहे? त्यामुळे चर्चा काही थांबली नाही. या मीममध्ये मजेशीर अंदाजात दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व गोलंदाजांना पलाश मुच्छलच्या चेहऱ्यात दाखवलं होतं. स्मृतीने पलाश समजून गोलंदाजांवर राग काढला असा त्या मीम्समधून अर्थ निघत होता. सोशल मीडियावर स्मृतीच्या आईने केलेल्या पोस्टनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर काही जणांच्या मते चुकून झालं असावं मत नोंदवलं गेलं. पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्मिता मंधानाने ही पोस्ट डिलिट केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

स्मृती मंधाना पलाश मुच्छलचं लग्न मोडलं

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे. मांडव सजला होता आणि सात फेरे घेणार तितक्यात ट्विस्ट आला. वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं बोललं गेलं. पण जसे दिवस उलटत गेले तसं या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळाल्या. अखेर पलाश मुच्छल आणि स्मृती मंधाना यांनी लग्न मोडल्याची घोषणा केली. त्यानंतर स्मृती मंधाना पुन्हा एकदा मैदानात परतली आणि क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in