
सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अशातच तुम्हाला जर सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग कुठे सापडली, तर काय कराल? अशा परिस्थितीत भल्याभल्या व्यक्तीच्या मनात नको-नको ते विचार येऊ शकतात. इतकं सोनं पाहिल्यानंतर ती बॅग आपल्याकडेच ठेवून घेऊ, असंही काहींच्या मनात येऊ शकतं. परंतु चेन्नईमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या पद्मा यांनी जे केलं, त्याचं कौतुक आता देशभरातील नागरिकांकडून होत आहे. चेन्नईतल्या टी-नगर परिसरात काम करणाऱ्या पद्मा यांना काही दिवसांपूर्वी एक बेवारस बॅग सापडली होती. या बॅगमध्ये 45 सॉवरेन (जवळपास 360 ग्रॅम) सोन्याचे दागिने होते. इतक्या मोठ्या रकमेचं सोनं पाहूनही पद्मा यांचा प्रामाणिकपणा डगमगला नाही.
या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेल्या बॅगमुळे पद्मा यांचं नशिब रातोरात बदलू शकलं असतं. कोणाला कानोकान खबर न लागू देता त्या स्वत:कडे ती बॅग ठेवू शकल्या असल्या. परंतु त्यांनी असं केलं नाही. त्यांनी ती बेवारस बॅग सुपरवायजरच्या मदतीने पाँडी बाजार पोलिसांच्या स्वाधीन केली. नंतर पोलिसांनी ती दागिन्यांची बॅग त्याच्या मूळ मालकाकडे सोपवली. पद्मा यांचा हा प्रामाणिकपणा सोशल मीडियावर चर्चेत आला. ही खबर साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्याही कानांवर पडली. पद्मा यांच्या कामगिरीबद्दल समजताच ते खूप खुश झाले आणि त्यांनी थेट पद्मा यांना त्यांच्या चेन्नई इथल्या घरी आमंत्रित केलं. रजनीकांत यांनी त्यांच्या प्रामाणिक स्वभावाचं तोंडभरून कौतुक केलं आणि सोन्याची चैन देऊन त्यांचा सन्मान केला. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Superstar #Rajinikanth personally called Padmaa and presented her with a gold chain..
She is a frontline worker who recovered 45 sovereigns of gold jewellery lying on the road and handed it over to its owner..
pic.twitter.com/Hc26G73sj0
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) February 3, 2026
पद्मा यांचा अशा पद्धतीने सन्मान करणाऱ्या रजनीकांत यांचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. रजनीकांत नेहमीच अशा लोकांना पुढे आणतात जे या समाजासाठी काहीतरी चांगलं करतात, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅनिल यांनीसुद्धा पद्मा यांचा सन्मान करत त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला.
रजनीकांत यांनी सर्वसामान्य व्यक्तीचा अशाप्रकारे सन्मान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच ते मदुराई इथल्या त्यांच्या सर्वांत मोठ्या चाहत्याला भेटले होते. रजनी शेखर असं या चाहत्याचं नाव असून ते पाच रुपयांमध्ये पराठा विकायचे. त्यातून गरीब लोकांचं पोट भरावं, असा त्यांचा हेतू होता. रजनीकांत यांनी शेखर यांना घरी बोलावलं आणि त्यांनाही सोन्याची चैन भेट म्हणून दिली.
She is a frontline worker who recovered 45 sovereigns of gold jewellery lying on the road and handed it over to its owner..
Leave a Reply