• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनाली कुलकर्णीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन; लिहिली भावूक पोस्ट

February 24, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनालीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असून सोशल मीडियावर तिने भावनिक पोस्ट लिहिली आहे. सोनालीचा मावस भाऊ अनिरुद्ध चेरेकर याचं निधन झालं आहे. अनिरुद्धसोबतचे काही फोटो शेअर करत सोनालीने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सोनाली आणि तिच्या घरचे त्याला प्रेमाने ‘अन्नूमा’ म्हणून हाक मारायचे. दरवर्षी रक्षाबंधनला सोनाली न चुकता त्याला राखी बांधायची. तो क्षणही तिने फोटोच्या माध्यमातून शेअर केला आहे.

सोनाली कुलकर्णीची पोस्ट

‘आमचा अन्नूमा.. हे जग सोडून गेला. प्रिय भाऊ, तुझ्या आत्म्याला शांती लाभो आणि तुला वेदनारहित नवीन जीवन मिळो. तू माझ्या ओळखीतल्या लोकांपैकी सर्वांत शुद्ध मन असलेली व्यक्ती होतास. निष्पाप, अध्यात्मिक, सर्वांची काळजी घेणारा, सर्वांशी जोडलेला, सर्वांवर नि:स्वार्थ प्रेम करणारा, सर्व गाणी मनपासून जाणणारा, तबला वाजवणारा आणि त्याच्या हातात चहा. तू जसा आहेस तसाच राहिल्याबद्दल आणि सर्वांत सोप्या मार्गांनी प्रेम पसरवल्याबद्दल धन्यवाद’, अशा शब्दांत सोनालीने भावना व्यक्त केल्या आहेत. सोनालीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीने तिच्या भावासोबतचे आठ फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधून तिचं आणि तिच्या भावाचं नातं अधोरेखित होत आहे. भावंडं सख्खी असली किंवा चुलत.. अनेकदा त्यांच्यासोबत इतक्या जवळचं नातं आणि मैत्री निर्माण होते की, त्यांची जागा दुसरी कोणतीच व्यक्ती घेऊ शकत नाही. अनिरुद्धच्या जाण्याने कुटुंबात आणि आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकत नसल्याची भावना सोनालीने तिच्या या पोस्टमधून व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत सोनालीलाही धीर देण्याचा आणि तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरीकडे सोनालीच्या ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण युद्ध थांबताच भारताचा मोठा खेळ, भारताचे 3 धुरंधर थेट विदेशात, निर्णय घेत..
  • मुंबईकरांच्या प्रवासात अडथळे, रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा, कधी, कोणत्या गाड्या रद्द?
  • मोठी बातमी! इराणकडून भारताला दणका, त्या एका निर्णयाने हाहाकार, आता भारताला..
  • विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख
  • Horoscope Today 10th April 2026 : आजचा दिवस दणदणीत जाणार… या राशींच्या लोकांसाठी मोठी खूशखबर; फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in