
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. सोनाक्षीने अनेक वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षीने जहीरसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सोनाक्षीच्या या लग्नाला तिच्या भावांचा विरोध असल्याचे सांगितले जाते. तिचे दोन्ही भाऊ लग्नात उपस्थित देखील नव्हते. शत्रुघ्न सिन्हा आणि पुनम सिन्हा सोनाक्षी सिन्हासोबत खंबीरपणे उभे दिसले. सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत सिव्हिल मॅरेज केले. सोनाक्षीने त्यांच्या घरीच लग्न केले. त्यानंतर जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. सलमान खान याच्या घरी सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची भेट झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्याच भेटीत कितीतरी तास गप्पा मारत बसले होते.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे लग्न झाल्यापासून सतत सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सोनाक्षी हॉस्पिटलमध्ये वडिलांना बघण्यासाठी गेली, त्यावेळीच ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले जात होते. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी प्रेग्नंसीच्या चर्चांवर अनेकदा उत्तर दिले. सोनाक्षीने अनेकदा वजन वाढल्याचेही बोलून दाखवले.
सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर पहिल्यांदाच आई पुनम सिन्हा यांनी भाष्य केले. पुनम सिन्हा यांनी म्हटले की, सोनाक्षीचे आमच्या आयुष्यात आगमन झाले होते तो एक आनंदाचा क्षण आमच्यासाठी होता. कारण आमच्या घरात मुलगी आली होती. मला वाटते की, आयुष्यात मुलींशिवाय काहीच नाही. मुली असणे खूप जास्त आवश्यक आहे.
सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीच्या अफवांबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, माहिती नाही किती वेळा आम्हाला आजी बनवले.. पण चला तो आनंदही आम्हाला मिळेल. नक्की तो आनंद मिळेल.. सोनाक्षी सिन्हाच्या आईने पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसीवर भाष्य केले. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी लग्नानंतर मुंबईच्या अत्यंत महागड्या भागात आलिशान घर घेतले. सोनाक्षी आणि जहीरचे हे घर आलिशान आहे.
Leave a Reply