
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या वणव्यात भारताला वेगवेगळ्या क्षेत्रात होरपळ सहन करावी लागत आहे. भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे सोन्याचा भावही कधी वाढतोय तर कधी कमी होतोय.
युद्धामध्ये सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु युद्ध सुरू झाले तेव्हापासून सोन्याचा भाव कमी झाला आहे. एकाच आठवड्यात सोनं तब्बल 11 हजार रुपयांनी घसरला आहे.
सोन्यासोबतच चांदीचा भावदेखील एकाच आठवड्यात 28000 रुपयांनी कमी झाला आहे. गेल्या शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,58,399 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 1,45,970 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी झाला आहे. म्हणजेच सोन्याचा भाव साधारण 12,429 रुपयांनी कमी झाला आहे.
चांदीचा भावदेखील साधारण 28100 रुपयांनी कमी झाला आहे. सध्याची ही स्थिती लक्षात घेता दागिने करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे. सामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)




Leave a Reply