• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सॅनिटायजरने प्रायव्हेट पार्ट जाळला, 3 दिवस अतोनात टॉर्चर; डेटिंग ॲपवरील पार्टनरने ओलांडल्या क्रूरतेच्या मर्यादा

February 24, 2026 by admin Leave a Comment


आजच्या सोशल मीडियाच्या युगात जग जवळ आलं आहे, असं आपण म्हणतो.. सोशल मीडियामुळे संवाद सोपा झाला आहे हे खरं आहे, यामुळे अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं देखील समोर येत आहे. अनेक तरुणमुल डेटिंग ॲपवर पार्टनर शोधत असतात, पण डेटिंग ॲपवर भेटलेला पार्टनर कधी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करेल काहीही सांगता येणार नाही. आता देखील असंच काही घडलं आहे. डेटिंग ॲपवर तरुण आणि तरुणीची ओळख झाली अखेर ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्यचा निर्णय घेतला. पण तरुणाने पार्टनरसोबत असं कृत्य केलं, ज्याची कल्पना देखील करु शकत नाही. त्याने 19 वर्षीय तरुणीचा सॅनिटायजरने प्रायव्हेट पार्ट जाळला आणि 3 दिवस अतोनात टॉर्चर केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचं नाव शिवम आहे. तर पीडित तरुणी BSc बायोटेकचं शिक्षण घेत होती… चारित्र्यावर संशय घेत शिवम याने तब्बल तीन दिवस तरुणीला बेदम मारहाण केली. फक्त मारहाण नाही तर, सॅनिटायजरने प्रायव्हेट पार्ट जाळला. 19 वर्षीय मुलीने पोलिसांना घडलेली घटना सांगितली… सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये डेटिंग ॲपवर शिवम आणि तरुणीची ओळख झाली. त्यानंतर काही काळातच, त्यांचं नातं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये बदललं… 16 फेब्रुवारी 2026 पासून छळ करण्यास सुरुवात झाली. सर्वात आधी तर, कथित आरोपीने स्टीलच्या बाटलीने तरुणीच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर भिंत आणि कपाटाला तरुणीचं डोकं आपटलं. एवढंच नाही तर, तिच्या पायांवर चाकूने वार केले… क्रुरतेच्या सर्व मर्यादा तेव्हा पार झाल्या जेव्हा त्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायजर शिंपडलं आणि आग लावली…. शिवम याने पीडित तरुणीचे व्हिडीओ काढले आणि तिला धमकी देण्यास सुरु केलं, ‘कधी आई होशील अशी लायकी तुझी ठेवणार नाही…’

आईने वाचवले प्राण, बंगाली भाषा ठरली कोड…

पीडित तरुणीने 18 फेब्रुवारी रात्री तरुणाच्या फोनचा वापर करत आईला फोन केला आणि बंगाली भाषेत घडलेली घटना सांगितली. कारण तरुणाला बंगाली भाषा कळत नव्हती… त्यानंतर आईने तत्काळ 112 नंबरवर फोन केला आणि पोलिसांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि पीडित तरुणीला रेस्कू केलं.

आईकडून बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न असे कलम जोडण्याची मागणी

ही धक्कादायक घटना सायबर सिटी गुरुग्रामचा सेक्टर-69 येथे घडली आहे. पीडितेची आईची सफदरजंग रुग्णालयात सतत रडत आहे. आईने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांना माहिती नव्हतं की, त्यांची मुलगी शिवम याच्यासोबत राहत आहे… मुलही पीजीमध्ये राहते… असंच सर्वांना वाटत होचं… गुरुग्राम पोलिसांनी कथित आरोपी शिवम याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dhurandhar 2 Collection : ‘धुरंधर 2’ सिनेमाला मोठा झटका, ‘हे’ लक्ष्य गाठणं कठीण, काय सांगतायेत आकडे?
  • इराण युद्ध थांबताच भारताचा मोठा खेळ, भारताचे 3 धुरंधर थेट विदेशात, निर्णय घेत..
  • मुंबईकरांच्या प्रवासात अडथळे, रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा, कधी, कोणत्या गाड्या रद्द?
  • मोठी बातमी! इराणकडून भारताला दणका, त्या एका निर्णयाने हाहाकार, आता भारताला..
  • विवोचा हा 9020mAh बॅटरी असलेला सर्वात पातळ फोन भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in