• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सूर्यकुमार यादव आणि गाैतम गंभीर यांना थेट मोठा इशारा, टी 20 वर्ल्ड कपमध्येच…

February 8, 2026 by admin Leave a Comment


टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली. विशेष बाब म्हणजे भारताने थेट विजयानेच टी-20 विश्वचषकाची सुरूवात केली. भारत विश्वचषकावर आपले नाव कोरेल असे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट संघ गेल्या काही दिवसांपासून धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. अनेक रेकॉर्ड भारताने आपल्या नावावर नोंदवली. भारताने पहिला सामना जिंकला असला तरीही अमेरिकेच्याविरोधात सामन्याबद्दल टीम इंडियाला एक मोठा इशारा देण्यात आला. सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघाला हा इशारा दिला आहे. कारण हा पहिला विजय असला तरीही पुढे स्पर्धा अधिक मजबूत असेल. मजबूत संघ या विश्वचषकात मैदानात उतरली आहेत आणि त्यांच्यासोबत सामने बाकी आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषकात भारतासोबत खेळण्यास नकार दिला. मात्र, भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार की नाही याबाबत अजून काही माहिती मिळू शकली नाहीये.

सुनील गावस्कर यांनी भारताच्या विजयानंतर बोलताना म्हटले की, भारताची फलंदाजी मोठी आहे. मात्र, पॉवरप्लेमध्ये निष्काळजी राहणे हा देखील त्याचा अर्थ अजिबात होत नाही. मुळात म्हणजे 160 धावा करणे सोपे नव्हते. पण शेवटी 30 धावांनी जिंकणे चांगले असते. मुळात म्हणजे या विजयाने बरेच काही नक्कीच सांगितले आहे.

पुढे सुनील गावस्कर यांनी म्हटले की, जर तुमच्याकडे 9, 10, 11 व्या क्रमांकावर आठ फलंदाज आणि गोलंदाज असतील त्यापैकी जर आठ फलंदाजांपैकी चार फलंदाज 7-8 पटकांत बाद झाले तर संघ संकटात सापडेल. विशेष करून मजबूत आणि अनुभवी संघाविरोधात.

पॉवरप्ले सहा षटकांचा असतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यात चार विकेट गमावाल. पॉवरप्लेमध्ये जाणाऱ्या विकेटच्या मुद्यावरून गावस्करांनी कान टोचले. त्यांनी पुढे म्हटले की, विश्वचषकासारख्या स्पर्धेत प्रत्येक संघ आपले सर्वोत्तम प्रदर्शन करतो, कारण अशा संधी वारंवार येत नाहीत. सुनील गावस्कर यांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ भारतीय संघाचा पावरप्लेमध्ये कामगिरीशी संबंध होता. पावरप्लेमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन अजिबातच चांगले राहिले नाही, त्यावर बोलताना सुनील गावस्कर दिसले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दारूसोबत चखना का खातात? कारण ऐकून पिणाऱ्याचीही झटकन उतरेल
  • Ashok Kharat | खरात मुस्लिम असता तर त्याची वरात काढली असती; बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
  • मुलींचा गैरफायदा घेणं…! अक्षय कुमार बद्दल लारा दत्ताचा थक्क करणारा खुलासा
  • एकट्याने बघा हा चित्रपट, प्रचंड बोल्ड सीन, 4 वर्षांपूर्वी करण्यात आला बॅन, अचानक YouTube वर झाला व्हायरल
  • हौसेला मोल नाही ! नीता अंबानींच्या हातातली एवढीशी बॅग, त्या किंमतीत येईल 1 बीएचके फ्लॅट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in