• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सून आणि मुलाच्या भांडणात आई मध्ये पडली अन्…. त्याने जे केलं ते पाहून अंगावर काटा येईल

March 13, 2026 by admin Leave a Comment


सणासुदीचे दिवस जवळ आले की प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. मग नवीन कपडे, रंगरंगोटी, खरेदी यांसह सर्वच गोष्टी येतात. मात्र याच कारणामुळे झालेल्या एका क्षुल्लक वादाचा अंत भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईदच्या नवीन कपड्यांवरून झालेल्या वादातून एका मुलाने आपल्या ६० वर्षीय वृद्ध आईची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नवी दिल्लीतील सीमापुरी परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

उत्तर-पूर्व दिल्लीतील सीमापुरी भागात ६० वर्षीय हमीदुन निशा आपल्या कुटुंबासह राहत होत्या. आपला मुलगा शेर अली, सून आणि नातवंडांसह त्या या घरात वास्तव्य करत होत्या. शेर अली हा व्यवसायाने टेलर असून तो गाझियाबादमध्ये काम करतो. बुधवारी रात्री त्यांच्या घरात ईदच्या कपड्यांवरून चर्चा सुरू होती. त्याच रात्री त्याचे पत्नी संजीदासोबत ईदच्या कपड्यांवरून भांडण झाले. संजीदाने त्याच्याकडे नवीन कपड्यांची मागणी केली. पण पैसे नाहीत, असे सांगत शेर अलीने नकार दिला. यावरुन त्या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.

शेर अली आणि संजीदा या दोघांमधील वाद विकोपाला गेला. शेर अलीने रागाच्या भरात पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या सुनेला वाचवण्यासाठी आणि मुलाचा राग शांत करण्यासाठी त्याची आई हमीदुन निशामध्ये पडल्या. त्यांनी शेर अलीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापाने आंधळ्या झालेल्या शेर अलीने स्वतःच्या आईलाच उचलून दगडाच्या फरशीवर जोराने आदळले.

फरशीवर आदळल्यामुळे हमीदुन निशा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्या. या घटनेनंतर जखमी आईला तातडीने जीटीबी (GTB) रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

यानंतर मृत महिलेची मुलगी शबनम हिने आपल्या सख्ख्या भावाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी शेर अलीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. मात्र एका क्षुल्लक वादाने सुखी संसाराची राखरांगोळी झाल्याचे बोललं जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?
  • Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी
  • tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
  • Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
  • सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले बारामतीत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in