• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर तब्बल 15 वर्षांनी एकत्र; शांततेत दडलेला थरार

March 11, 2026 by admin Leave a Comment


तब्बल पंधरा वर्षांनंतर अभिनेता सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर तीन दमदार कलाकार एकत्र झळकत आहेत. ‘बोल बोल राणी’ असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव असून सिड विंचुरकरने या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. येत्या 10 जुलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी सोशल मीडियावर त्याचा टीझर पोस्ट करण्यात आला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये रहस्य आणि उत्सुकतेचं जबरदस्त मिश्रण पाहायला मिळतंय. खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात, पार्श्वभूमीला घोंगावणारं रहस्यमयी संगीत आणि बंदुकीतून सुटलेली गोळी.. या सगळ्यामुळे ‘नेमकं घडलंय तरी काय?’ असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे.

या व्हिडिओमुळे चित्रपटाच्या कथेबाबत कोणताही थेट उलगडा होत नसला, तरी त्यात दडलेली अस्वस्थ करणारी शांतता आणि थरारक वातावरण चित्रपट एका वेगळ्याच पातळीवर नेणार असल्याचं स्पष्ट होतं. विशेष म्हणजे पंधरा वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार एकत्र झळकणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांच्यासोबत संभाजी ससाणेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेमकी ही मुलगी कोण? तिचे हात का बांधलेले आहेत? गोळी कुणासाठी आहे? आणि या सगळ्यामागे कोणतं सत्य दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच चर्चेत रंगू लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bol Bol Rani (@bolbolranithefilm)

चित्रपटाबद्दल निर्माता, दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाला, ”थ्रिलर म्हणजे फक्त भीती दाखवणं नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ ठेवणं. ‘बोल बोल राणी’चा हा व्हिडीओ या प्रवासाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ आहे. प्रेक्षकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावं.”

न्यूझिलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा सहनिर्माते असून तपन विचारे, यश राम शाहानी, आयुष कृप्लानी असोसिएट निर्माते आहेत. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. रहस्यमयी कथानक, तगडी स्टारकास्ट आणि वेगळ्या मांडणीमुळे ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in