• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुंदर पिचाई यांच्यापेक्षा पाचपट श्रीमंत आहे ही भारतीय महिला उद्योजक, नेटवर्थ किती पाहा ?

December 30, 2025 by admin Leave a Comment


जयश्री उल्लाल यांचा जन्म 27 मार्च 1961 मध्ये लंडन येथे झाला असला तरी त्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे पिता एक फिजिसिस्ट होते आणि भारत सरकार सोबत काम करत होते. जेव्हा जयश्री केवळ चार वर्षांची होत्या. तेव्हा त्यांचे कुटुंब दिल्लीला परतले. येथे त्यांनी जिजस एण्ड मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले.16 वर्षांच्या असताना त्या अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी सन फ्रांसिस्को स्टेट यूनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगमध्ये बीएस केले आणि सांता क्लारा युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये एमएस केले.

1980 च्या दशकात जयश्री यांचे करिअर सुरु झाले. त्यांनी फेअरचाईल्ड सेमीकंडक्टर आणि एएमडी सारख्या कंपन्यात इंजिनिअरिंगमधून बिझनस आणि मार्केटींगच्या दिशेने झेप घेतली. नंतर उंगरमॅन-बास आणि क्रेसेंडो कम्युनिकेशन्समध्ये काम केले. 1993 मध्ये सिस्को जॉईंट केले, तेथे त्यांनी लॅन स्विचिंग बिझनसला 7 अब्ज डॉलरपर्यंत पोहचवले.

2008 मध्ये जयश्री यांना अरिस्टा नेटवर्क्सच्या सीईओ बनण्याची संधी मिळाली. तेव्हा हा एक छोटा स्टार्टअप होता. त्यांच्या लीडरशिपमध्ये 2014 मध्ये कंपनी पब्लिक झाली आणि आज क्लाऊड नेटवर्किंगमध्ये लीडर आहे. मायक्रोसॉफ्ट, मेटा, amazon आणि गुगल सारखे मोठे क्लायंट त्यांच्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहेत. 2024 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 7 अब्ज डॉलरपर्यंत पोहचला.

जयश्री यांच्याजवळ अरिस्टाचे सुमारे 3% शेअर्स आहेत. त्यामुळे त्यांची नेटवर्थ 5.7 अब्ज डॉलर ( सुमारे 50,730 कोटी ) झाली आहे. 2025 च्या हुरुन रिच लिस्टमध्ये त्या भारतीय वंशाच्या सर्वात श्रीमंत प्रोफेशनल बनल्या आहेत.हे यश केवळ पैशाचे नाही तर प्रभावाचे देखील आहे. जयश्री यांनी दाखवून दिले की महिला टेकमध्ये टॉपवर पोहचू शकतात.हुरुन रिपोर्टनुसार मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला याची नेटवर्थ 9,770 कोटी रुपये आहे, जी जयश्री उल्लाल यांच्या तुलेनत खूपच कमी आहे.तर सुंदर पिचाई ₹5,810 कोटी रुपयांसह यादीत सातव्या स्थानावर आहेत.

जयश्री यांना अनेक मोठे पुरस्कार मिळालेले आहेत.साल 2015 मध्ये जयश्री उल्लाल यांना अर्न्स्ट एंड यंग एंटरप्रेन्योर ऑफ द ईयर, साल 2018 मध्ये बॅरन्सचा वर्ल्ड्स बेस्ट सीईओ, 2023 मध्ये इकॉनॉमिक टाईम्सचा ग्लोबल इंडियन ऑफ द ईयर आणि सिलीकॉन व्हॅलीच्या मोस्ट इन्फ्लुएंशियल लिस्टमध्ये त्यांना जागा मिळाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं! राज ठाकरे यांची थेट अजितदादांशी युती; किती जागांवर लढणार?
  • ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करून इंग्लंडने केली भारताची बरोबरी, नेमकं काय केलं जाणून घ्या
  • दोन मुस्लीम देशातच आली युद्धाची नौबत, दिला 24 तासांचा अल्टीमेटम
  • अमोल कोल्हे, मधुराणी गोखले यांच्या ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा भव्यदिव्य सेट
  • T20 World Cup 2026: इंग्लंडकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in