• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुंठीवाचून खोकला जाणार..! अबरार अहमदने काव्या मारनच्या संघात खेळायचं की नाही? पीसीबी घेणार निर्णय

March 17, 2026 by admin Leave a Comment

द हंड्रेड लीग स्पर्धेत भारतीय फ्रेंचायझी पाकिस्तानी खेळाडूसाठी बोली लावतील याचा कोणी विचारही केला नव्हता. काव्या मारन यांची फ्रेंचायझी असलेल्या सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदसाठी बोली लावली. इतकंच काय तर त्याला संघात घेण्यासाठी प्रतिस्पर्धी फ्रेंचायझीच्या तुलनेत अधिकची बोली लावली. अबरार अहमदसाठी 2.30 कोटी मोजून त्याला संघात घेतलं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे भारतीय संघ हँडशेकही करत नाही, त्यांच्या हातून ट्रॉफी घेत नाही. अशा स्थितीत पाकिस्तानी खेळाडू कसा काय? संघात घेतला असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारू लागले. त्यामुळे हा निर्णय सनरायझर्स लीड्सच्या अंगलट आल्याचं दिसत आहे. या निर्णयाबाबत कोच डॅनियल विटोरीने सारवासारवही केली. पण त्यातून काही समाधान झाल्याचं दिसत नाही. असं असताना अबरार अहमद द हंड्रेड लीग खेळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण, पाकिस्तान संघाचं क्रिकेट वेळापत्रक…

… तर अबरार अहमद खेळणार नाही

इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग स्पर्धेचं आयोजन होतं, त्याचवेळी पाकिस्तानचा वेस्ट इंडिज दौरा आहे. या दौऱ्यात पाकिस्तानचा संघ कसोटी मालिका खेळणार आहे. द हंड्रेड 2026 स्पर्धा 21 जुलैला सुरू होईल आणि 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. तर पाकिस्तानचा वेस्ट इंडिज दौरा 15 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान आहे. हा दौरा अजून लांब आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जून महिन्यात संघाची घोषणा होईल. अबरार अहमद हा कसोटी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे संघात त्याची निवड होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे काव्या मारनच्या सनरायझर्स लीड्स संघाला ठेंगा दाखवण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान वेस्ट इंडिज दौऱ्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महत्त्वाचा भाग आहे. पहिला सामना क्वींस पार्क ओव्हलमध्ये होईल, तर दुसरा सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत होईल. या मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ 4 दिवसांचा वॉर्म अप सामना खेळणार आहे. खरं तर अबरार अहमदला संघात घेतल्याने सनरायझर्स हैदराबाद संघाची डोकेदुखी वाढली आहे. जर अबरार अहमदची निवड वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी झाली तर सनरायझर्ससाठी सुंठी वाचून खोकला गेला असंच असेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा
  • चाणाक्य सांगतात, ‘या’ गोष्टी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in