• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सिकंदर , मंगोल आले, आम्ही येथेच..काळालाही जे जमले नाही, तो एक… इराणचे अमेरिकेला उत्तर

April 7, 2026 by admin Leave a Comment


तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संस्कृती आज रात्री संपेल अशी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की आजर रात्री एक संस्कती समाप्त होईल. इराणने जर होर्मुझ सामुद्रधुनी खोलली नाही, तर अमेरिका विध्वंस घडवेल.ट्रम्प यांनी म्हटलेय की माझी इच्छा असे होऊ नये अशीच आहे. परंतू कदाचित हे होईल.या पोस्टनंतर इराणच्या वतीने देखील कडक भाषेत उत्तर दिले आहे.

तुर्कीतील इराणी दुतावासाने एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलंय की सिंकदरने याला जाळले. मंगोलानी नष्ट केले. इतिहासाने अनेकदा आमची परीक्षा घेतली. परंतू इराण आजही तेथेच उभा आहे. दुतावासाने ट्रम्पची संभावना ‘सनकी’ अशी करत ज्या संस्कृतीला काळ कधी मिठवू शकला नाही ती या एका व्यक्तीच्या धमकीने संपणार नाही.

इराणने त्यांच्या प्राचीन संस्कृतीला संपवणे कोणालाही शक्य नाही असे म्हटले आहे. या उत्तराने इराणने युद्धासाठी मानसिक स्थिती तयार केली असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रम्प यांच्या आक्रमक आवेषानंतरही इराणने अमेरिकेसोबत होणाऱ्या सर्व अप्रत्यक्ष चर्चा आणि बॅकचॅनल डिप्लोमसी समाप्त केल्या आहेत. इराणी माध्यमातील वृत्तानुसार आता अमेरिकेसोबत कोणत्याही संदेशांचे अदान-प्रदान होणार नाही. इराणच्या एका वरिष्ठ सुत्रांनी सांगितले की तेहराण केवळ पोकळ आश्वासनांच्या बदल्यात सार्वभौमत्व दृष्ट्या महत्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनीला खोलणार नाही.

इराणने मागणी आहे की केवळ युद्धविराम नाही तर युद्धाचा संपूर्णपणे शेवट व्हायला हवा. इराणने स्पष्ट केले आहे की अमेरिकेसोबत कोणत्याही करारासाठी ठोस गॅरंटीची गरज आहे.

येथे पोस्ट पाहा –

Alexander burned it. The Mongols ravaged it. History tested it.#Iran is still here. A psychopath’s threats won’t end what time couldn’t. pic.twitter.com/Okp1dJSByo

— Iran Embassy in Türkiye (@Iran_in_Turkiye) April 7, 2026

ट्रम्प यांची डेडलाईन : आज रात्री मोठा विध्वंस घडवणार ?

ट्रम्प यांनी इराणला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार मंगळवारी मध्यरात्रीचा वेळ दिला आहे. त्यांनी धमकी दिली आहे की जर इराणने ऐकले नाही तर अमेरिकन सैन्य इराणचा प्रत्येक पूल आणि प्रत्येक पॉवर प्लांट नष्ट करेल. तज्ज्ञांच्या मते नागरिक ठिकाणांना लक्ष्य करणे हे युद्ध अपराध म्हणून ओळखले जाते. या दरम्यान, इराणने दावा केला आहे की त्याच्या महत्वपूर्ण तेल टर्मिनल खर्ग बेटावर हल्ले सुरु झाले आहेत. अमेरिका आणि इस्रायलची लढाऊ विमाने सतत बॉम्बहल्ले करत आहेत. आता सर्व जगाची नजर त्या डेडलाईनकडे लागली आहे. जी महाविनाशाचे संकेत देत आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांसाठी तातडीचा अलर्ट, पुढच्या 48 तासांसाठी… वाचा नेमकं काय सांगितलं?
  • RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?
  • Chanakya Niti : या तीन गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त; चाणक्य नीती काय सांगते?
  • Disha Vakani : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या दयाबेनवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन
  • स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाणं, या चार ठिकाणी सूर्यास्त पाहण्यासाठी लोक विदेशातून येतात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in