
Commercialization of public spaces: राज्यातील मोठ्या आणि मेट्रो शहरात मैदानं कमी पडत आहेत. काही ठिकाणी मैदानं आहेत, पण त्यांची निगा आणि देखभाल होत नाही. ती बकाल झाली आहेत. तर काही ठिकाणी मैदानं आहेत, पण खेळाडू नाहीत असा सगळा गोंधळ सुरू आहे. अर्थात असे असेल तरी अनेक मैदानांवर नागरिकांची मोठी गर्दी असतेच. आता या मैदाना प्रेमींचा हिरमोड करणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील मोठ्या सार्वजनिक मैदानांवर पंचतारांकित हॉटेल्स त्यांचे आऊटलेट उघडू शकतात. त्यासाठीची परवानगी नगरविकास खात्याने दिली आहे.
अनेक गोंडस टॅग लावून निर्णय माथी मारला?
शहरातील मोठ्या मैदानांवर पंचतारांकित हॉटेल्स पाय पसरू शकतील. शहरी विकासाला चालना देण्यासाठी, पर्यटन वाढावे आणि स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी हा निर्णय लोकांच्या माथी मारण्यात आला आहे. नगरविकास खात्याच्या या निर्णयाने अनेक संगटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर हक्काची मैदानं पंचतारांकित हॉटेल्सला देण्यामागे काय धोरण आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. या नवीन धोरणानुसार, विशिष्ट अटी, शर्ती, नियमांचे या हॉटेल्सला पालन करावे लागणार आहे. मोठ्या मैदानांवरील एक विशिष्ट भागच या हॉटेल्सला देण्यात येणार आहे. पण एकदा बिऱ्हाडं थाटल्यावर ही हॉटेल्स मनमानी करणार नाहीत, याची काही शाश्वती आहे का, असा सवाल नागरीक विचारत आहेत.
मैदानासह, खेळाडू नागरिकांचं मरण
पंचतारांकीत हॉटेल्स या मैदानाच्या एका भागावर कन्व्हेक्शन सेंटर आणि पर्यटन वाढीसंदर्भातील सुविधा उभारू शकतील. अर्थात त्यासाठी मैदानाचा एखादा भाग त्यांना वापरता येणार आहे. मैदानाचा मूळ वापर आणि पर्यायवरणाचा विचार त्यासाठी करावा लागणार आहे. अटी आणि शर्तीं भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. या निर्णयावर सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्था, राजकीय संघटना, क्रीडा संघटना आणि नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. या उपक्रमामुळे वापराजोगी जागा कमी होण्याची भीती आहे. आता सरकार याविषयीची कितपत दखल घेते हे लवकरच समोर येईल.
Leave a Reply