• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सानियाने फक्त एकच इशारा केला आणि अर्जुन तेंडुलकरने घेतलं मिठीत, पाहा Video लग्न लागताच काय झालं?

March 5, 2026 by admin Leave a Comment


Arjun Tendulkar- Saaniya Chandhok: सानिया चंडोक आता सचिन तेंडुलकर यांच्या घरची सून झाली आहे. 5 मार्च रोजी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ सानिया आणि अर्जुन एकमेकांना वरमाला घालतानाचा आहे. या दोघांनी एकमेकांचा स्वीकार करून गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर सानियाने अर्जुनला एक इशारा केला आणि अर्जुनने लगेच तिला मिठीत घेतलं. सानियाने अर्जुनला मिठीत घेण्याचा इशारा केला. त्यानंतर अर्जुनने क्षणाचाही विलंब न करता सानियाला मिठीत घेतलं.

अर्जुन आणि सानिया यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सचिन तेंडुलकर, आई अंजली तेंडुलकर, बहीण सारा तेंडुलकर आणि इतर कुटुंबिय होते. तसेच मित्रांनीही हजेरी लावली होती. लग्नानंतर अर्जुन आणि सानिया मीडियासमोर आले आणि त्यांनी सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

Arjun Tendulkar, the son of Sachin Tendulkar, got married to Saaniya Chandhok today in Mumbai.❤

Congratulations to Arjun and Saaniya. Best wishes for a happy life together. 💐 pic.twitter.com/HhkU9is64F

— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 5, 2026

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यावेळी दिग्गजांनी हजेरी लावली. क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू या लग्नसोहळ्याला हजर होते. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी, अजीत आगरकर, राहुल द्रविड, किरण मोरे, अनिल कुंबले, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, झहीर खान, युवराज सिंग आणि वेंकटेश प्रसाद यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

सारा तेंडुलकरने अर्जुन आणि सानियाची ओळख करून दिली होती. सारा अनेकदा सानियाला जिम सेशन्स, ब्रंच आणि सुट्टीसाठी सोबत घेऊन जात असे. ओळखीपासून सुरू झालेली गोष्ट हळूहळू मैत्रीत आणि नंतर दोघांमध्ये प्रेम झालं. त्यानंतर कुटुंबियांनीही या नात्याला पसंती दर्शवली. दोघांनी 13 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थिती साखरपुडा केला होता.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in