• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमान खानच्या हिरोइनवर कोसळला दु:खाचा डोंगर; आईच्या निधनाने पूर्णपणे खचली

April 8, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री झरीन खानवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज (8 एप्रिल, 2026) झरीनची आई परवीन खान यांचं निधन झालं. झरीनच्या कुटुंबीयांनी याबद्दलची माहिती दिली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास परवीन खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. झरीनच्या टीमकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय, ‘झरीन खान आणि सना खान यांच्या आई परवीन खान यांचं 8 एप्रिल रोजी निधन झालं.’ आईच्या आजारपणाबद्दल झरीन सतत सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना माहिती देत होती. त्याचप्रमाणे आई लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करण्याचं तिने आवाहन केलं होतं.

फेब्रुवारी महिन्यात झरीनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ‘आईला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा’, असं तिने म्हटलं होतं. त्याआधी ऑक्टोबर 2025 मध्येही परवीन यांना आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हासुद्धा झरीनने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आईच्या प्रकृतीविषयी चाहत्यांना अपडेट दिली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही काळ त्यांची तब्येत ठीक होती. परंतु काही महिन्यांतच पुन्हा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

झरीन खानच्या टीमची पोस्ट-

आईच्या निधनाने झरीन पूर्णपणे खचली आहे. झरीन 38 वर्षांची असून तिने अद्याप लग्न केलं नाही. आईच्या प्रकृतीच्या कारणास्तव ती बराच वेळ कुटुंबाला द्यायची. आईशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी गोष्ट ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करायची. आईसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओसुद्धा तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

झरीनने ‘फिर से रिस्टार्ट’ या शॉर्ट ड्रामामधून अभिनयक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. 2010 मध्ये तिने सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सलमाननेच तिला बॉलिवूडमध्ये संधी दिल्याचं म्हटलं जातं. झरीनना बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप यश मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात असं झालं नाही. दिसण्यावरून तिची तुलना सतत अभिनेत्री कतरिना कैफशी केली जाऊ लागली. नंतर तिला बॉलिवूड चित्रपटांचे ऑफर्स मिळणं कमी होत गेलं. तिने ‘डाका’ आणि ‘जट्ट जेम्स बाँड’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 2021 मध्ये ती ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना
  • जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होता, तिथेच..संजय राऊतांचे बोचरे शब्द
  • मराठमोळ्या अभिनेत्रीचं अपहरण, 3 महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं आणि… स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुखरुप सुटका
  • Weather Alert : आज रात्री येणार मोठी आफत… यावेळचं संकट मोठं, वेधशाळेचा इशारा; या राज्यांना मोठा धोका
  • कलिंगडच्या सालीपासून बनवा चविष्ट पदार्थ, साल कधीच फेकू नका…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in