• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमान खानच्या गाण्यावर ऐश्वर्या रायचा पती अभिषेकसोबत धमाल डान्स; व्हिडीओची एकच चर्चा

March 9, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक जोड्या आहेत, ज्या कधी काळी विभक्त झाल्या असल्या किंवा त्यांच्या ब्रेकअपला कितीही वर्षे झाली तरी चाहत्यांमध्ये त्या कायम चर्चेत असतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. या दोघांची लव्ह-स्टोरी, त्यांची भांडणं आणि ब्रेकअप जगजाहीर आहे. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर दुसरीकडे सलमान आजही सिंगलच आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे ऐश्वर्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ. नुकत्याच एका लग्नसमारंभात ऐश्वर्या तिच्या पतीसोबत पोहोचली होती. यावेळी दोघांनी स्टेजवर धमाल डान्ससुद्धा केला. याच डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्यामागचं कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक हे चक्क सलमान खानच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

ऐश्वर्याने या लग्नसोहळ्यात निळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे, तर अभिषेकनेही निळ्या आणि पांढऱ्या रंगसंगतीचा कुर्ता पायजमा घातला आहे. लग्नसोहळ्यात ऐश्वर्या आणि अभिषेक हे ‘सलाम-ए-इश्क’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हे सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं आहे. मुदित अदानी आणि अनन्या दिवांजी यांच्या लग्नसोहळ्या ऐश्वर्या आणि अभिषेक नाचताना दिसले. त्यांच्यासोबत नीता अंबानी यांनीसुद्धा ठेका धरला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by GlamBlitz | Bollywood And Trending News (@glamblitzz)

सलाम-ए-इश्क हे गाणं शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने संगीतबद्ध केलं असून या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल अडवाणीने केलं आहे. तर समीर अंजान यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या मल्टि स्टारर चित्रपटात सलमान खान, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, जुही चावला, गोविंदा, विद्या बालन, जॉन अब्राहम आणि शनॉन इस्रा यांच्या भूमिका आहेत.

याआधी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नातही ऐश्वर्या-अभिषेकच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंढोकच्या लग्नसोहळ्यात ऐश्वर्याने निळ्या रंगाचा भरजरी सूट परिधान केला होता. तर अभिषेकने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा लांब सूट घातला होता. गाडीमधून उतरताच या दोघांनी पापाराझींसमोर फोटो आणि व्हिडीओसाठी पोझ दिले आणि त्यानंतर हातात हात घालून ते कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी पुढे निघून गेले.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Volkswagen Taigun Facelift : जबरदस्त लूक आणि हायटेक फीचर्ससह नवी टाइगुन सादर, पाहा काय आहे खास?
  • ‘ही’ खास बाईक लॉन्च, किंमत ऐकून व्हाल थक्क, पाहा भारतात कधी येणार स्वस्त मॉडेल
  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in