
Munmun Dutta Slams Indian Tourists: अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ मालिकेत मुनमुन हिने साकारलेल्या बबीताजी या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. मुनमुन फक्त तिच्या भूमिकांमुळेच नाही तर, अन्या कारणांमुळे देखील चर्चेत असते. आता मुनमुन एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकताच लोकप्रिय पर्यटन स्थळी काही भारतीय पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, मुनमुन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही व्हायरल व्हिडीओचे क्लिप शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये मुनमुन हिने निराशा व्यक्त केली आहे. व्हिडीओमध्ये काही भारतीय असं काही वर्तन करताना दिसत आहेत, जे लाजिरवाणं आहे… जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील लाज वाटेल…

शिवाय, काही जण नैसर्गिक स्थळे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असल्याचं देखील चित्र दिसत आहे. लोकप्रिय पर्यटन स्थळांवर हे लज्जास्पद वर्तन घडत आहे. काही पुरुष पार्यटन स्थळी अर्धनग्न फिरत आहेत, तर काही पुरुष समुद्रात कार चालवत आहेत… हे सर्व पाहिल्यानंतर मुनमुन दत्ता हिला प्रचंड राग आला आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, मुनमुन दत्ता ही निरोगी पर्यावरणाची कट्टर समर्थक आहे आणि तिला प्राण्यांवरही प्रेम आहे. नुकताच, मुनमुन हिने तिच्या सकाळच्या दिनचर्येची एक गोड झलक शेअर केली आणि तिच्या नुकत्याच रेस्क्यू केलेल्या मांजरीच्या पिल्लाची चाहत्यांना ओळख करून दिली.
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर कायम प्राण्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

(@mmoonstar)
Leave a Reply