• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समुद्रात वादळ आलं अन् लागला जगाला थक्क करणारा शोध, समोरचं दृश्य बघून…संशोधकही थक्क!

April 11, 2026 by admin Leave a Comment


News Island Found : मानव हा संपूर्ण पृथ्वी फिरून बसला आहे, असा एक समज आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाबद्दल मानवाला माहिती आहे, असेही अनेकजण गृहित धरतात. परंतु प्रत्यक्षात मात्र पृथ्वीवर असे काही ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी अजूनही माणूस पोहोचू शकला नाही. सोबतच पृथ्वीवर अशा काही जागा आहेत, ज्या खूप रहस्यमयी आहेत. सध्या भर समुद्रात अशाच एका सापडलेल्या जागेची चर्चा होत आहे. संशोधकांना समुद्राच्या मधोमध एक चकित करणारे बेट सापडले आहे. या बेटावर मणुष्यवस्ती नाही. या नव्या शोधाची सगळीकडेच चर्चा होत आहे.

नेमका काय शोध लागला आहे?

मिळालेल्या माहितीनुसार जर्मनीच्या संशोधकांना अटार्क्टिकाच्या वेडेल सागरात एक नवे बेट आढळले आहे. अल्फ्रेड व्हेगेनर इन्स्टिट्यूट फॉर पोलर अँड मरीन रिसर्चने (एडब्ल्यूआय) या शोधाबाबत माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार 8 फेब्रुवारी 2026 रोजी एका मोहिमेवर असलेले एक आंतरराष्ट्रीय पथक अल्फ्रेड व्हेगेनर इन्स्टिट्यूटच्या जहाजातून प्रवास करत होते. हे जहाज अंटार्क्टिकाच्या उत्तर-पश्चिमेस असलेल्या वेडेल सागरात होते. त्यावेळी या नव्या बेटाचा शोध लागला.

Scientists exploring the Weddell Sea in the Antarctic were in for a surprise after stumbling across a secret island in an area marked a ‘danger zone’ https://t.co/6GmN3jYvxn pic.twitter.com/L5Ibw8ea06

— OSGINT (@posted_news) April 10, 2026

अगोदर हिमनग असावा असे वाटले पण….

सागरातून प्रवास करत असताना अचानक हवामान खराब झाले. त्यानंतर हे जहाज जॉइनव्हिले बेटाजवळ जाऊन थांबले. त्याच वेळी संशोधकांना एक नवे बेट दिसले. आतापर्यंतच्या नकाशात हे नवे बेट खूपच घातक आणि धोकादायक ठिकाण असल्याचे नमूद केलेले आहे. संशोधकांना अगोदर दिसत असलेले ठिकाण एखादा हिमनग असावा, असे वाटले. परंतु नंतर मात्र हा तर एक वेगळा बेट असल्याचे त्यांना समजले आणि नव्या बेटाचा शोध लागला.

बेटाची लांबी, रुंदी किती

दररम्यान, आतापर्यंतच्या अभ्यासानुसार या बेटाची लांबी 130 मीटर, रुंदी 50 मीटर आहे. समुद्रातील पाण्यापासून या बेटाची उंची 16 मीटर आहे. हे बेट साधारण 69,965 वर्ग मीटरचे आहे. तज्ज्ञांच्या मते बर्फामुळे या बेटाकडे कोणाचेच लक्ष गेले नसावे. दरम्यान, आता या नव्या बेटाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यातून नेमकी काय नवी माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?
  • ‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप
  • युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ
  • Horoscope : असा दिवस पुन्हा कधीच येणार नाही, आयुष्य जाईल बदलून; वाचा 12 एप्रिलचे राशिभविष्य!
  • बाईक प्रेमींसाठी मोठी संधी, कावासाकी Versys-X 300 वर भरघोस सवलत, किमतीत मोठी कपात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in