• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समुद्रात बुडून अभिनेत्याचा मृत्यू, सौरव गांगुली जे म्हणून गेला त्यावरून मोठा वाद; अभिनेत्रीने सुनावलं

April 8, 2026 by admin Leave a Comment


बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांच्या निधनानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. सौरव गांगुली यांना त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आता टीकेला सामोरं जावं लागत आहे. अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने गांगुली यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रतिक्रिया दिली आहे. स्वस्तिकाने गांगुली यांच्या वक्तव्याला असंवेदनशील म्हटलं आहे. “सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या लोकांनी आपल्या शब्दांबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. विशेषतः जेव्हा ते अशा नोकरी किंवा व्यवसायाबद्दल बोलत असतील ज्याची त्यांना पूर्ण माहिती नाही,” अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला. एखाद्याच्या कामाला कमी लेखणं हे कशाप्रकारे चुकीचं असतं हे स्वस्तिकाने उदाहरणासह स्पष्ट केलं.

स्वस्तिका म्हणाली की, प्रत्येक कलाकाराला समान विशेषाधिकार मिळत नाही. मोठ्या स्टार्सना अनेक सुविधा मिळतात, पण प्रत्येकजण त्यांच्या इतका भाग्यवान नसतो. राहुलसारख्या कलाकाराला आपल्या कामासाठी जोखीम पत्करावी लागते. राहुल बॅनर्जीचा शूटिंगदरम्यान समुद्रात बुडाल्यामुळे मृत्यू झाला. ओडिशाच्या तलसारीमध्ये ‘भोले बाबा पार करेगा’ या मालिकेसाठी शूटिंग करताना राहुल पाण्यात उतरला आणि काही वेळातच तो बुडू लागला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वयाच्या 43 व्या वर्षी राहुलने आपले प्राण गमावले.

या घटनेमुळे कलाविश्वात शोककळा पसरली आणि सेटवरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेते आणि तंत्रज्ञांनी अधिक चांगल्या सुरक्षेची मागणी करत एक दिवसाचा संप केला. मात्र निर्माते आणि चॅनलसोबत चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. शूटिंगदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि एक प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) विकसित करण्यास सर्व पक्षांनी सहमती दर्शवली.

सौरव गांगुली यांनी राहुल बॅनर्जीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं. पण त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं की, शूटिंगसाठी का असेना पण तो पाण्यात का उतरला हे मला समजत नाही. गांगुली यांच्या याच वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. राहुल जेव्हा समुद्रात शूटिंगसाठी उतरला, तेव्हा जोरदार लाटांमुळे किंवा पाण्याच्या खोलीमुळे त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. सेटवर असलेल्यांना परिस्थिती इतकी गंभीर होईल याची पुसटशीही कल्पना नव्हती. समुद्रात गेलेला राहुल बराच वेळ बाहेर न परतल्याने क्रू मेबर्सना चिंता वाटू लागली आणि त्यांनी त्याचा शोध सुरू केला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in