• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिताय? तर ‘हे’ महत्त्वाचे नियम आजत जाणून घ्या, नाहीतर…

April 8, 2026 by admin Leave a Comment


पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत असतात. पण पाणी कोणत्या वेळेत आणि किती प्यायला हवे यासाठी देखील काही नियम आहे. सांगायचं झालं आजच्या काळात असंख्य लोक फिटनेसच्या मागे लागले आहेत आणि त्यामध्ये काही अडचण नाही पण अनेक लोकांनी सकाळी उठल्याबरोबर लिटरभर पाणी पिण्याचा नियमच केला आहे. रिकाम्या पोटी पाणी पिणे चांगले असले तरी, आरोग्य तज्ज्ञ असा इशारा देतात की, जर ते योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात प्यायले नाही, तर फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतो. तर मग सकाळी पाणी कसे प्यावे? अशात जाणून घेऊया की, जास्त पाणी प्यायल्यास कोणत्या समस्या उद्भवू शकतात.

पचनक्रिया मंदावण्याचा धोका: साधारणपणे, सकाळी आपल्या शरीराची पचनशक्ती काहीशी कमी असते. त्या वेळी शरीराला ऊर्जा देण्याऐवजी, एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्याने पचनक्रिया आणखी मंदावते. यामुळे, आपण केलेला नाश्ता व्यवस्थित पचत नाही आणि पोटातच राहतो, ज्यामुळे अपचनाचा त्रास होतो.

बद्धकोष्ठतेची समस्या: अपचनामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. जर अन्न व्यवस्थित पचले नाही, तर शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, कालांतराने यामुळे तीव्र बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे तहान असेल एवढेच पाणी प्यावे.

भूक न लागणे: सकाळी जास्त पाणी प्यायल्याने पोटावर दाब वाढतो. यामुळे पोट फुगल्यासारखे वाटणे आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही लोकांमध्ये, यामुळे पोटदुखी किंवा उलट्या झाल्यासारखे वाटणे देखील होऊ शकते. भूक न लागल्यामुळे अनेक जण सकाळच्या खाण्याकडे दुर्लक्ष करतात.

आयुर्वेदानुसार, पाणी मर्यादित प्रमाणात प्यावे, कारण असे म्हटले जाते की सर्व काही शक्य आहे. जागे झाल्यावर लगेच लिटरभर पाणी पिण्याचा स्वतःवर दबाव टाकू नका. आपल्या शरीरानुसार, तहान लागेपर्यंतच कोमट पाणी प्या. नेहमी बसून आणि हळूहळू घोट घेत पाणी प्या. उभे राहून पाणी पिण्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो.

ऋतूनुसार सुद्धा पाणी पिण्याच्या सवयीत बदल केले पाहिजे. हिवाळ्यात दिवसभर कोमट पाणी पिणे चांगले असते. उन्हाळ्यात, तुम्ही खोलीच्या तापमानाचे पाणी जास्त प्रमाणात पिऊ शकता. पण रिकाम्या पोटी फ्रिजमधील पाणी कधीच पिऊ नका. पाणी तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात साठवून पिणे चांगले, पण तेही प्रमाणातच. सकाळी एकदम 2 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न टाळून दिवसभरात हळूहळू पाण्याचे प्रमाण वाढवणे चांगले. ज्यामुळे तुमचं आरोग्य देखील चांगले राहिल.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वारंवार होणाऱ्या आर्थिक नुकसानीला कंटाळला आहात? कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी करा हे बदल
  • Vaibhav Suryavanshi: मुंबई इंडियन्सला लोळवले, वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची प्रतिक्रिया तुफान व्हायरल, म्हणाला तरी काय?
  • पाकिस्तानला शाबासकी? इराण-अमेरिका युद्धविरामावर जगभरातील देशांची प्रतिक्रिया काय? भारताने काय म्हटलं?
  • ‘धुरंधर 2’च्या लाटेत 10 कोटी बजेटच्या चित्रपटाचा बोलबाला; 6 दिवसांत कमावला 302% नफा
  • मोठी बातमी ! मुंबईत बसून दिल्ली हादरवण्याचा भयंकर कट, स्पेशल सेलने मुसक्या आवळताच हादरवणारी माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in