• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे? योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

February 5, 2026 by admin Leave a Comment


सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी पिणे ही आरोग्यासाठी एक उत्तम सवय मानली जाते. रात्रभराच्या झोपेनंतर शरीर डिहायड्रेट झालेले असते अशा वेळी पाणी प्यायल्याने शरीराला नवसंजीवनी मिळते. मात्र नक्की किती पाणी प्यावे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

Morning-Empty-Stomach-Water-Benefits-and-Right-Quantity-8

आरएमएल रुग्णालयातील औषध विभागाचे संचालक डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास पाणी पिणे पुरेसे आहे. शरीराला सक्रिय करण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी हे प्रमाण योग्य मानले जाते.

Morning-Empty-Stomach-Water-Benefits-and-Right-Quantity-5

सकाळी एकाच वेळी खूप जास्त पाणी पिण्याऐवजी ते एक एक घोट आणि हळूहळू प्यावे. यामुळे शरीरात पाणी व्यवस्थित शोषून घेते. एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने पोटावर ताण येऊन पचन बिघडू शकते.

Morning-Empty-Stomach-Water-Benefits-and-Right-Quantity-3

खूप थंड पाणी पिण्यापेक्षा कोमट किंवा साधे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. रात्रीच्या नैसर्गिक उपवासानंतर शरीरातील पाण्याची पातळी भरून काढण्यास मदत होते.

Morning-Empty-Stomach-Water-Benefits-and-Right-Quantity-4

सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म वाढते आणि पचन संस्था सक्रिय होते. तसेच शरीराला ऊर्जा मिळते आणि आळस दूर होऊन ताजेतवाने वाटते. यासोबतच सकाळी पाणी पिण्याच्या सवयीमुळे दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची शिस्त लागते.

Morning-Empty-Stomach-Water-Benefits-and-Right-Quantity-2

पण प्रत्येकाची शारीरिक ठेवण वेगळी असते. त्यामुळे आपल्या शरीराचे संकेत ओळखून पाण्याचे प्रमाण ठरवावे. विशेषतः ज्यांना किडनी (मूत्रपिंड) किंवा पोटाशी संबंधित गंभीर आजार आहेत, त्यांनी पाण्याचे प्रमाण ठरवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Price: सोनं चक्क 70 हजार रुपयांवर येणार, लवकरच… महत्त्वाची माहिती समोर
  • UPSC सिव्हील सेवा परीक्षेचे ( CSE ) नोटिफिकेशन जारी,काय झाला मोठा बदल वाचा….
  • सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे? योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
  • Silver Rate : चांदी तब्बल 20000 रुपयांनी स्वस्त; एका झटक्यात भाव घसरला, आणखी स्वस्त होणार?
  • नरेंद्र मोदी यांच्यावर संसदेत हल्ला करण्याचा प्लॅन? काँग्रेसच्या खासदारांनी…हादरवणारी अपडेट समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in