• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सकाळी रिकाम्यापोटी दूध, साखरेशिवाय प्या ब्लॅक कॉफी, आरोग्याच्या या समस्या होतील कमी

February 27, 2026 by admin Leave a Comment


आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या भारतात चहा प्रेमींची कमतरता नाही. पण त्यासोबत कॉफी प्रेमी देखील बरेचजण आहेत. खरं तर आपल्यापैकी बरेच जण दिवसाची सुरूवात गरम कॉफीने करतात. तसेच निरोगी आरोग्यासाठी ब्लॅक कॉफी ही अनेकांमध्ये आवडते पेयं बनलेलं आहे. कारण ब्लॅक कॉफी केवळ ऊर्जा प्रदान करते असे नाही, तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. तुम्ही ब्लॅक कॉफी पीत नसाल तर ती पिण्यास सुरुवात करा, कारण यामुळे आळस आणि लठ्ठपणा जलद गतीने कमी होतो. चला जाणून घेऊया की ब्लॅक कॉफी सेवन करणे कोणासाठी फायदेशीर ठरेल.

ब्लॅक कॉफीचे फायदे

ब्लॅक कॉफीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, कारण ब्लॅक कॉफीमध्ये दूध, साखर यांचा वापर केला जात नाही. तर स्ट्राँग आणि चवीसाठी ओळखले जाणारी या कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या शरीरात बराच वेळ ऊर्जा टिकून राहते. यासोबत हे लक्षात घेण्यासारखे आहे की ब्लॅक कॉफी तिची नैसर्गिक चव टिकवून ठेवते आणि त्यात कोणतेही गोड पदार्थ नसतात. म्हणूनच ज्यांना गोड कॉफी किंवा चहा आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे-

1. वजन कमी करणे –

काळ्या कॉफीचे फायदे हे चवीपलीकडे आहेत. कारण यामध्ये कॅलरीज कमी असून अँटिऑक्सिडंट्स भरपूर आहे. त्यामुळे ब्लॅक कॉफी प्यायल्याने चयापचय वाढवता येतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

2. हॅप्पी हार्मोन्स –

ब्लॅक कॉफी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. ती प्यायल्याने मूड देखील सुधारतो आणि कामावर लक्ष केंद्रित होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ब्लॅक कॉफीमुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रांसमीटर वाढतात. हे न्यूरोट्रांसमीटर आनंदाच्या भावनांशी संबंधित आहेत, म्हणजेच ब्लॅक कॉफीमुळे “हॅप्पी हार्मोन्स” वाढतो.

3. ऊर्जा पातळी –

ब्लॅक कॉफी प्यायल्याने उर्जेची पातळी वाढते आणि थकवा कमी होतो. तुम्हाला जर थकवा जाणवत असेल, तर ब्लॅक कॉफी प्यायल्याने ऊर्जा मिळू शकते.

4. मधुमेह –

ब्लॅक कॉफी प्यायल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने हा धोका 7% पर्यंत कमी होऊ शकतो. क्लोरोजेनिक अॅसिडसारखे अँटिऑक्सिडंट्स इन्सुलिन संवेदनशीलता आणि ग्लुकोज चयापचय सुधारतात, रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात.

5. यकृत –

दररोज 3-4 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने यकृताचे आरोग्य सुधारते. ते यकृतातील फॅटचे संचय कमी करू शकते आणि हानिकारक एंजाइम्स (ALT/AST) चे प्रमाण कमी करू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in