• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

April 10, 2026 by admin Leave a Comment


भारतात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान सध्या इराण-अमेरिका युद्धविरामाचं श्रेय लाटण्यात मग्न आहे. गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका, इस्रायल युद्धानंतर अखेर बुधवारी युद्धविरामाची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी युद्धविरामाची घोषणा तर केलीच पण पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या आवाहनानंतर आपण 15 दिवसांच्या शस्त्रसंधीबद्दल सहमती झाली, असंही त्यांनी नमूद केलं होतं. त्यानंतर पाकच्या पंतप्रधानांनीही या युद्धविरामात आपली मोलाची भूमिका असल्याचे सांगत, शांतीदूत असल्याचे म्हणत, त्यांनी स्वत:च पाठीवर कौतुकाची थाप मारली. एवढंच नव्हे तर आता पाकिस्तानतर्फे 1 नाही त्यांच्या तीन लोकांना नोबेल देण्याची मागणी केली जात आहे.

तीन नोबेल द्या 

काल त्यांनी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि आर्मी चीफ असीम मुनीरना शांततेचं नोबले देण्याची मागणी केली होती, मात्र आता पाककडून आणखी एक व्यक्तीसाठी नोबेलची मागणी होत्ये. खरंत, पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेत एक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि आता परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनाही ‘नोबेल शांतता पुरस्कारा’साठी नामांकित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे मुख्य प्रतोद राणा मोहम्मद अर्शद यांनी सभागृहात हा ठराव मांडला. या ठरावाच्या मजकुरानुसार, सभागृहाने देशाच्या नेतृत्वाच्या “प्रभावी मुत्सद्देगिरी”बद्दल प्रशंसा केली. या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं ठरावात म्हटलं आहे. तसेच या ठरावात विशेषतः इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा उल्लेख आहे, जो जागतिक शांततेसाठी एक गंभीर धोका बनला होता. या तीन सर्वोच्च पाकिस्तानी नेत्यांनी हे आंतरराष्ट्रीय संकट टाळण्यात आणि युद्धविराम सुरक्षित करण्यात “महत्त्वाची भूमिका” बजावली असा विश्वास या सभेतील लोकांनी व्यक्त केला .

शांतीप्रिय राष्ट्राची प्रतिमा

पाकिस्तानने एक शांतताप्रिय देश म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये रचनात्मक, संतुलित आणि सकारात्मक भूमिका बजावली आहे, असे पंजाब विधानसभेत या ठरावादरम्यान नमूद करण्यात आलं. या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी औपचारिक नामांकन सादर केले जावे, अशी मागणी या ठरावात एकमताने करण्यात आली.

एकीकडे पाकिस्तान जेव्हा स्वतःच गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटांशी झुंजत आहे, परंतु सत्ताधारी पक्ष त्यांना जागतिक शांतता दूत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळेसच ही घडामोड घडत्ये. जर हे (नोबेलसाठी) नॉमिनेशन नामांकन औपचारिकपणे स्वीकारलं गेलं, तर ते पाकिस्तानसाठी एक महत्त्वपूर्ण राजनैतिक यश ठरू शकतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…
  • धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली तर… करुणा मुंडेंचा तो शाप महायुतील सरकारला भोवणार?
  • बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
  • कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
  • एका रात्रीत स्टार बनली ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण एका अपघाताने बदललं आयुष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in