• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संधिवात झाल्यावर काय खावे, काय खाऊ नये, रामदेव बाबा यांनी सांगितलं काय काळजी घ्यावी?

February 5, 2026 by admin Leave a Comment


आयुर्वेद, योगा यांचा प्रचार, प्रसार करणारे बाबा रामदेव लोकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सांगतात. आपले वय जसे वाढत जाते, तसे तसे अने आजार व्हायला लागतात. आयुर्वेद आणि योगासने यामुळे तुम्ही यातील अनेक आजारांवर मात करू शकता. रामदेव बाबा त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर आरोग्याविषयी माहिती देत असतात. सध्या त्यांनी संधिवाताचा त्रास असेल तर नेमके काय करावे? याबाबत सविस्तर सांगितले आहे.

चुकीच्या आहारामुळे वाढतो संधिवात

बाबा रामदेव यांच्यानुसार संधिवात या आजारात तुमचे गुडघे दुखायला लागतात. खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. शरीर थरथरते, बोटांना मुंग्या येतात. तसेच वयानुसार इतरही काही अडचणी डोकं वर काढतात. त्यामुळे या आजारावर मात करायची असेल तर काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. चुकीचा आहार हे संधिवात होण्याचे प्रमुख कारण आहे. तुम्ही खूपच थंड खाद्यपदार्थ, कच्चाय भाज्या फार उशिरा खात असाल तर तुम्हाला संधिवात होण्याची शक्यता असते. तसेच तुमची बदललेली जीवनशैली यामुळेदेखील संधिवात होण्याची शक्यता असते. उशिरा झोपणे, उशिरा उठणे, खूप वेळासाठी एकाच जागेवर बसून राहणे यामुळेदेखील संधिवात वाढतो. चिंता, तणाव, भीती, बेचैनी यामुळेही संधिवात वाढण्याची शक्यता असते.

नेमकं काय करावं?

तुम्हाला संधिवाताचा त्रास जाणवत असेल तर त्याला वेळीच थोबवणे गरजेचे आहे. योग्य आहार आणि नैसर्गिक उपचार याच्या जोरावर हे शक्य असल्याचे रामदेव बाबा सांगतात. संधिवात जास्तच वाढला तर कोरफड, पारिजात, शेवगा यांचा रस प्यावा. तसेच हळद, मेथी यामध्येही संधिवाताला कमी करण्याचे गुण असतात.

कोणकोणते पदार्थ खावेत?

संधिवात वाढत असेल तर आंबट आणि थंड पदार्थ खाणे टाळावे. फुलकोबी, दही, आवळा आणि काकडी यामुळेदेखील संधिवात वाढतो. त्यामुळे हे खाद्यपदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. किचनमधील काही वस्तूदेखील तुम्हाला संधिवातापासून दूर ठेवतात. हळद, आलं, तुळस, लवंग, दालचिनी यांचे सेवन केल्याने संधिवात कमी होतो. तंबाखू, चुना हे खानेदेखील टाळावे, असे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..
  • मध्यस्थीच्या चर्चेआधीच पाकिस्तानचा दारुण पराभव, इस्रायलने शरीफ सरकारला झुकवलं, नेतन्याहू जे बोलले ते करुन दाखवलं
  • मान, कोपरे आणि काखेत काळपटपणा आहे? सावधान, लगेचच डॉक्टरांकडे जा, नाही तर थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in