• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान, भाऊ कदम, प्रसाद ओक यांची हजेरी; काय म्हणाले?

February 7, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संघाच्या वतीने संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. वरळीच्या नेहरु सेंटर सभागृहात या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान, भाऊ कदम, प्रसाद ओक यांनीही हजेरी लावली होती. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आपण जागतिक नेते बनू पण विश्वगुरू भाषणांनी नव्हे तर उदाहरणांद्वारे बनू. जर तुम्ही भारतातील असाल, तर हा स्वभाव तुमच्यात आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे भारतातील आहेत. भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत. पहिले – जे अभिमानाने म्हणतात की आम्ही हिंदू आहोत. दुसरे: जर आपण हिंदू आहोत, तर आपण आहोत, अभिमान बाळगण्यासारखे काय आहे? तिसरे – हळूवारपणे सांगा, आम्ही हिंदू आहोत. जर तुम्ही घरी येऊन विचारले तर आम्ही तुम्हाला सांगू. चौथे: जे विसरले आहेत, ज्यांना विसरले गेले आहे. अधिक लोकांना विसरावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रसाद ओक काय म्हणाले?

अभिनेते प्रसाद ओक यांनी यावेळी बोलताना म्हटले की, शताब्दी पूर्तिनिम्मित्त या कार्यक्रमला उपस्थित होतो. त्यांचे अविस्मरणीय बोल ऐकण्यात आले. राष्ट्राप्रति विचार हे मोलाचे आहेत, खूप काही देऊन जाणारे आहेत. भारत म्हणजे भूगोल नाही भारत विचार आहेत. सलमान खान आले माझ्या साठी खूप शॉकिंग होत. पण हे आदरपूर्ण आहेत, त्यांनी निमंत्रणाला सन्मान दिला आहेत आणि असे येणं जाणं असायला पाहिजे. त्यामुळे सार्वभौम विचार वाढेल. अभिनेते भाऊ कदम यांनी यावेळी बोलताना म्हटले की, ‘मोहन भागवत यांचं सत्र ऐकलं, त्यांचे विचार ऐकले.सगळ्या भारतीयांनी त्यांचे विचार ऐकावे.’

जेडी मजीठिया यांनी म्हटले की, संघाला 100 वर्ष पूर्ण झाले त्या कार्यक्रमानिमित्त आलोय. देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम आपणच करू शकतो. भारत विश्व सत्ता बनणारच आहे, पण भारत विश्वगुरू बनणार आहेत. आपण जर संघ बद्दल ऐकलं तर खूप प्रगती होईल. आता मुलांकडे सोशल मीडिया आले आहे. त्यांना ते पाहायचंय, जर त्यांनी योग्य पाहिलं तर त्यांचा विकास होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू
  • Pakistan-Saudi Arabia : इराणसोबत चर्चा फेल होताच पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, 13 हजार सैनिक, फायटर जेट्स सौदी अरेबियात दाखल
  • आशा भोसले यांच्या निधनावर पाकिस्तानी सेलिब्रिटी हळहळले, पोस्ट करत म्हणाले…
  • अरेरे किती ते हाल! अशोक खरातच्या घशा खाली घास उतरेना, बायकोबद्दल विचारताच…
  • Asha Bhosle Movie: गायिकाच नव्हे अभिनेत्रीही, 79 व्या वर्षी केलं डेब्यू; आशा भोसलेंचा हा चित्रपट पाहिलाय का ? डोळ्यांत येईल पाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in