
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही काळापासून तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आहे. अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री आजही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र, आता तिला टक्कर देणारी आणखी एक अभिनेत्री चर्चेत आली आहे.
श्वेता तिवारीला टक्कर देणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत ‘अर्चना’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता आजही तिच्या ग्लॅमर आणि फिटनेससाठी ओळखली जाते.
श्वेता तिवारी हिने 1998 मध्ये ‘कलीरें’ या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. तर अंकिता लोखंडे हिने 2006 मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या टॅलेंट हंट शोमधून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेची नेटवर्थ सुमारे 30 कोटी रुपये आहे तर श्वेता तिवारी जवळपास 81 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. दोघींमध्ये वयाचं अंतर जरी कमी असलं तरी फिटनेस आणि ग्लॅमरच्या बाबतीत अंकिता लोखंडेची वेगळीच ओळख आहे.
अंकिता लोखंडे तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असते. तिचं मुंबईतील घर अत्यंत लक्झरी असून त्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. हे 8 BHK अपार्टमेंट असून त्यात होम थिएटर आणि तीन स्विमिंग पूलसारख्या सुविधा आहेत. या घराचे फोटो सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असतात.




Leave a Reply