
अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक मलिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता श्वेता तिच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने क्लासी आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात…
हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखली मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. श्वेता तिवारीचा हा लूक तुम्ही देखील कोणत्याही कार्यक्रमात फॉलो करु शकता…
श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, पलक देखील आई सारखीच क्लासी आणि ग्लॅमरस दिसते. पलक हिने देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. अभिनेता सलमान खान याच्या सिनेमातून पलक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
श्वेता तिवारी फक्त टीव्ही विश्वातच नाही तर, सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.




Leave a Reply