• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेवटी ठरलं! भाजपाकडून शिंदे गटाला थेट प्रस्ताव, मुंबई पालिकेसाठी सर्वात मोठी ऑफर; महापौर…

January 27, 2026 by admin Leave a Comment


BMC Mayor Election : राज्यात महापालिकेची निवडणूक संपली आहे. राज्यभरातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी ही निवडणूक झाली होती. यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला जास्त जागा असल्या तरीही अनेक ठिकाणी भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत गाठता आलेले नाही. त्यामुळेच भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती होत आहे. मुंबई, ठाणे, जळगाव अशा अनेक ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. दरम्यान, या सर्व घडामोडींदरम्यान मुंबईचा महापौर कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. असे असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपाकडून अखेर शिंदे यांच्या शिवसेनेकडे एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे लवकरच मुंबईत महापौर निवडला जाऊ शकतो.

नेमका प्रस्ताव काय? काय होणार?

मुंबईत महापौरपदाची निवड करण्यासाठी महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनात शिंदे यांच्या पक्षाने भाजपाकडे अडीच वर्ष महापौरपदाची मागणी केल्याचे सांगितले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील दावोसच्या दौऱ्यावर असल्याने महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. असे असतानाच आता भाजपाने एक मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकत्रित गट स्थापन करून त्याची नोंदणी एकत्रितपणे करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचे म्हटले जात आहे.

एकत्रितपणे गट स्थापन करण्यासाठी प्रस्ताव

महापौर निवडताना तसेच मुंबई पालिकेचा कारभार हाकताना आपली ताकद राहावी. बहुमताचा आकडा आणखी भक्कम राहावा यासाठी भाजपाकडून शिंदे गटाला एकत्रितपणे गट स्थापन करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावात भाजपाकडे गटनेतेपद तर शिंदे यांच्या शिवसेनेकडे प्रतोद पद देण्याचीही भाजपाने तयारी दाखवल्याचे म्हटले जात आहे.

शिंदे गट गट स्थापन करणार होता, पण…

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक आज त्यांच्या गटाची स्वतंत्रपणे नोंदणी करणार होते. परंतु ही प्रक्रिया लांबवीवर पडली आहे. असे असतानाच आता भाजपाकडून एकत्रितपणे गटनोंदणी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगितले जात असल्याने भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ब्लॉकबस्टर चित्रपटातील गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्त; स्टुडिओतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
  • दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..
  • सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद, पण रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?, सामनाचा मोठा दावा काय?
  • मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी मास्टर खेळी, आकडे बदलले, नेमकं काय घडलं?
  • Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in