
'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरे यानं त्याच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने लग्न केलं आणि त्यानंतर नवीन घरात गृहप्रवेश करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली.
गौरव मोरेनं या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. काहींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून तर काहींनी नवीन घरात त्याची प्रत्यक्ष भेटून त्याचं अभिनंदन केलं.
या सर्वात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील काही कलाकार मात्र कुठेच दिसले नाहीत. या कलाकारांनी सोशल मीडियावरही त्याच्यासाठी कोणतीच पोस्ट लिहिली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. शिवारी परब, पृथ्विक प्रताप, समीर चौघुले, वनिता खरात ही सर्व मंडळी ऑस्ट्रेलियाला होती. तर नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओमकार राऊत हे सर्वजण नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर होते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित माने मात्र पत्नीसह गौरव मोरेच्या नवी घरी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून पोहोचला होता. हास्यजत्रेचे इतर कलाकार जरी परदेशात असले तरी सोशल मीडियावर त्यांनी गौरवसाठी पोस्ट का लिहिली नाही, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.





Leave a Reply