• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 3 बड्या नेत्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश, धक्का कुणाला?

April 12, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरल्याचे समोर आले आहे. अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा संपूर्ण राज्याला प्रत्यय आला. अशातच आता शिवसेनेत जोरदार इनकमिंग पहायला मिळाले. पंढरपूरमध्ये 3 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यामुळे पंढरपुरात पक्षाची ताकद वाढली आहे. यामुळे भाजप आमदार समाधान औताडे यांची आगामी निवडणुकीत चिंता वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

3 बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.प्रणिता भालके तसेच आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

भगीरथ भालके हे पंढरपूरात विकासाची गंगा आणतील

या पक्षप्रवेशावर बोलताना शिंदे म्हणाले की, जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसेच भगीरथ भालके हे पंढरपूरात विकासाची गंगा नक्की आणतील. त्यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार असून भालके यांच्या खांद्यावरचा भगवा झेंडा हा फक्त शिवसेनेचा नसून तो भागवत धर्माचा, प्रभू श्रीरामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा असल्याचे नमूद करत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.

📍 पंढरपूर, #सोलापूर |

सोलापूर जिल्ह्यातील #पंढरपूर येथे #शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.प्रणिता भालके तसेच आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्यासह शेकडो… pic.twitter.com/US7KN6pmE2

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 12, 2026

शेकडो पदाधिकारी शिवसेनेसोबत जोडले जात आहेत – शिंदे

अनिल सावंत आणि तानाजी सावंत यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे, पण हे दोघे शिवसेनेत एकदिलाने काम करतील. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. काही चॅनलवालेच डरकाळी फोडत आहेत. ती ऐकून काही जण म्याव-म्याव करत आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांमुळे आणि भगव्याच्या शानमुळेच दररोज हजारो नेते , लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले जात आहेत असंही शिंदे यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक
  • SRH vs RR Live Streaming : हैदराबादसमोर राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना जिंकण्यापासून रोखणार?
  • या देशाचा आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक, २०० हून अधिक जण ठार झाल्याचा संशय
  • आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in