• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाहिद आफ्रिदी या बाबतीत T20 World Cup स्पर्धेतील सर्वात अपयशी फलंदाज, आणखी कोण कोण?

February 4, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. चाहत्यांना या स्पर्धेत 20 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत अनेक विक्रम मोडीत निघताना पाहायला मिळतील . तसेच चाहत्यांनाच नवे विक्रमांचं साक्षीदार होण्याची संधी मिळेल. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक फलंदाजांनी धमाका केलाय.तसेच असे काही फलंदाज आहेत जे या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले आहेत. या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

Shahid Afridi Pakistan Former Batter

पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे. आफ्रिदी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 32 पैकी 5 डावात भोपळा फोडण्यात अपयशी ठरला आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

Tillakaratne Dilshan Sri Lanka

श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशान टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत शून्यावर सर्वाधिक वेळा बाद होणारा दुसरा फलंदाज आहे. दिलशान 34 डावांत 5 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : Icc X Account)

Andre Russell West Indies

या यादीत तिसऱ्या स्थानी तब्बल 10 फलंदाज आहेत, जे प्रत्येकी 4-4 वेळा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत शून्यावर बाद झाले आहेत. या फलंदाजांमध्ये श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या आणि विंडीजचा माजी फलंदाज आंद्रे रसेल याचा समावेश आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

Ashish Nehra Team India

टीम इंडियाकडून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 3 वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याच्या नावावर आहे. नेहरा व्यतिरिक्त क्विंटन डी कॉक, शाकीब अल हसन, पाथुम निसांका हे फलंदाजही प्रत्येकी 3-3 वेळा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत शून्यावर बाद झाले आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक, सूर्यकुमार नाही तर या खेळाडूचा पत्ता चालणार! कसं काय ते समजून घ्या
  • दीपिकाला तिचा हट्टच नडला; 1000 कोटींच्या चित्रपटातून एक्झिट, प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली जागा
  • आयुष आणि तन्वीची रात्री चर्चा, बिग बॉसमध्ये आज भांडणाऐवजी काय घडणार?
  • ‘World T20’ नाव बदलून ‘T20 World Cup’ कसं झालं? त्या मागचं लॉजिक काय? जाणून घ्या
  • IND vs AFG : अफगाणी जोडीचा सेमी फायनलमध्ये शतकी तडाखा, टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान, फायनलचं तिकीट कोण मिळवणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in