• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शरीर तंदूरस्त ठेवायचंय? तर सकाळी रिकाम्यापोटी रात्रभर पाण्यात भिजवलेल्या ‘या’ ड्रायफ्रुट्‌सचं करा सेवन

March 4, 2026 by admin Leave a Comment


शरीर निरोगी राखण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे . आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. जर तुम्हालाही निरोगी राहायचेय आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुकाचे सेवन करा. चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात मनुके सेवन केल्याने कोणते 8 फायदे आपल्या शरीराला तंदुरस्त ठेवण्यास मदतात करतात.

भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे –

1. अशक्तपणावर मात करण्यासाठी-

मनुकामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते, जे अशक्तपणा कमी करण्यास आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करते.

2. पोटाच्या समस्यांसाठी-

तुम्हाला जर वारंवार बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाणे फायदेशीर ठरू शकते. पाण्यात भिजवल्यानंतर मनुक्यांमधील फायबरचे प्रमाण आणखी प्रभावी होते.

3. ऊर्जा वाढवण्यासाठी-

तुम्हाला सकाळी अशक्तपणा जाणवत असेल तर भिजवलेले मनुके खा, कारण त्यात नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. ते खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

4. हाडे मजबूत करणे

वयानुसार हाडांचे दुखणे सामान्य आहे. हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाऊ शकता. त्यात बोरॉन आणि कॅल्शियम असते, जे हाडे आणि सांधे मजबूत करतात.

5. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी-

मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

6. डोळे निरोगी राहण्यासाठी

आजकाल आपण तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप स्क्रीनकडे पाहत राहतो, ज्यामुळे आपले डोळे थकू शकतात. भिजवलेल्या मनुक्यांमधील पॉलीफेनॉलिक फायटोन्यूट्रिएंट्स आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना कमकुवत होण्यापासून वाचवण्यास मदत करतात.

7. त्वचा चमकदार करण्यासाठी

महागड्या स्किन केअर प्रोडक्ट वापरण्या ऐवजी, भिजवलेले मनुके खाणे हा एक चांगला पर्याय आहे. ते विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात.

8. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे

जर तुम्ही बदलत्या हवामानात वारंवार आजारी पडत असाल तर भिजवलेले मनुके खा. त्यांच्या गुणधर्मांमुळे तुमच्या शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

कसे सेवन करावे?

8 ते 10 मनुके स्वच्छ पाण्यात एका ग्लासमध्ये रात्रभर धुवून भिजवा. सकाळी उठल्यावर सर्वात आधी मनुके चावून घ्या आणि ते मनुक्यांच पाणी प्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in