• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वॉशिंग मशीन सुरू असताना चूकनही करू नका अंघोळ, कारण समजलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

April 8, 2026 by admin Leave a Comment


आजच्या काळात माणूस हा प्रचंड बिझी झाला आहे, प्रत्येकाच्या मागे घाई असते. एकाचवेळी खूप सारे काम करायची असतात. त्याचा परिणाम म्हणून आजचा माणूस हा मल्टिटास्किंग झाला आहे. म्हणजे तो एकाचवेळी अनेक काम करत असतो. महिलांबाबत बोलायचं झालं तर महिला या पुरूषांपेक्षाही जास्त मल्टिटास्किंग असतात. म्हणजेच त्यांना अनेकदा एकापेक्षा जास्त आघाड्यावर काम करावं लागतं. घराची जबाबदारी सांभाळावी लागते आणि नोकरी देखील करावी लागते. मात्र हे सर्व करत असताना आपलं आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होतं आणि भविष्यात त्याची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. अनेकदा असं होतं की कामाच्या नादात आपण छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, मात्र नंतर याचे फार मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात.

त्यासाठी आपण आज एक छोटं उदाहरण घेऊयात, आपल्यातील अनेकजण असे असतात ज्यांच्या मागे प्रचंड घाई असते. त्यामुळे आपण एकाचवेळी अनेक काम करत असतो. अनेक जण एकीकडे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन सुरू करतात, तर दुसरीकडे त्याचवेळेस बाथरूममध्ये अंघोळ करतात. मात्र जर तुमचं वॉशिंग मशीन सुद्धा बाथरूममध्येच असेल तर अशा पद्धतीने वॉशिंग मशीन सुरू ठेवून अंघोळ करणं तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. कारण अनेकदा असं होतं की शॉर्ट सर्किट झाला किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे वॉशिंग मशीनमध्ये करंट उतरू शकतं. बाथरूममध्ये देखील पानी असतं, त्यामुळे तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. अशावेळी बसणाऱ्या विजेच्या धक्क्याची तीव्रता ही पाण्यामुळे अनेक पटींनी वाढते, त्यामुळे त्यात तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

त्यामुळे कधीही वॉशिंग मशीन सुरू असताना त्याचवेळी अंघोळ करू नका. शक्यतो वॉशिंग मशीन हे बाथरूममध्ये ठेवूच नका. तुम्ही इतर ठिकाणी जिथे कोरडी जागा असेल अशा ठिकाणी ठेवू शकता. वॉशिंग मशिनमध्ये कपडे किंवा पाणी टाकताना नेहमी एक काळजी घ्या, सर्व प्लग बंद आहेत ना? याची खात्री करा आणि नंतरच मग वॉशिंग मशीन ऑपरेट करा. त्यामुळे अशा प्रकारच्या संकटापासून तुमचा बचाव होऊ शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काळ्या केसांसाठी कोणत्याही हेअर कलरची गरज नाही….! ‘या’ तेलांचा आठवड्यातून 2 वेळा वापरा
  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?
  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in