
आपल्याकडे डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं. जीवरक्षक म्हटलं जातं. पण हॉस्पिटल स्टाफच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या निरागस, निष्पाप बाळाचा जीव गेला तर ? अशा वेळी व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होता. कानपूरच्या बिठूर ठाणे क्षेत्रात अशीच एक हृदय हेलावणारी भयानक घटना घडल्याचे समोर आले आहे. तिथे एका खासगी रुग्णालयात नवजात बाळाचा दुर्दैवी, वेदनादायी मृत्यू झाला. ही घटना बिथूर येथील ब्रह्मा नगर येथील राजा रुग्णालयात घडली, हे हॉस्पिटल डॉ. विवेक मिश्रा चालवतात. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रुग्णालयात एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. कुटुंबातील पहिलं अपत्य होतं ते, त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला, त्यामुळे घरात अतिशय आनंदाचं वातावरण होतं.
NICU च्या वॉर्मरमध्ये ठेवलं बाळ, अचानक शॉर्ट सर्किट
जन्मानंतर लगेचच, नवजात बाळाला देखभाल करण्यासाठी आणि शरीराचे तामपान नियंत्रित ठेवण्यासाठी त्य रुग्णालयाच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये एका वॉर्मर मशीनमध्ये ठेवण्यात आले. आई आणि बाळ दोघेही लवकरच स्वस्थ होतील आणि घरी परत येतील अशी कुटुंबाला आशा होती. मात्र त्याचवेळी वॉर्मर मशीनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि त्या मशीनला मोठी आग लागली. ती आग एवढी वेगाने पसरली, कोणाला काही कळलंच नाही, काहीही सुधरेना. वॉर्मरमध्ये झोपलेले ते नवजात बाळही आगीच्या विळख्यात सापडलं.
जन्मानंतर अवघ्या काही तासांतच मृत्यू
मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबियांचं लक्ष जाईपर्यंत ते बाळ गंभीर भाजलं होतं. तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले, मात्र अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या, त्या निष्पाप बाळाचा होरपळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबियांना, त्या बाळाच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला, कारण ते त्यांचं पहिलंच अपत्य होतं. ज्या बाळाची आतुरतेने वाट पाहिली, जिच्या हसण्याने घर आनंदणार होता, त्याच घरात शोकाकुल वातावरण होत. रडूनरडून कुटुंबियांची हालत खराब झाल.
निष्काळजीपणाचा आरोप
या दुर्दैवी घटनेनंतर, मृत बाळाच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांवर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. जर योग्य सुरक्षा मानकांचे पालन केलं गेलं असतं आणि मशीनची नियमित तपासणी केली गेली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती आणि आम्हाला आमचं बाळ गमवावं लागलं नसतं, असं त्यांचं म्हणणं आहे. बिघडलेली परिस्थिती पाहून डॉक्टर मिश्रा आणि संपूर्ण स्टाफ हॉस्पिटल सोडून फरार झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून संपूर्ण हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply