• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभव सूर्यवंशीमुळं अभिषेक शर्माचं करिअर संपणार, पाकिस्तानी क्रिकेटरच्या विधानामुळे आता नवा वाद; बोलून गेला असं काही की…

April 12, 2026 by admin Leave a Comment


Vaibhav Suryavanshi Controversy : यंदाच्या आयपीएलमध्ये 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी सगळीकडे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तो मैदावर बॅट घेऊन आला की धावांचा पाऊसच पडतो. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरोधात फक्त 26 चेंडूमध्ये 78 धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी पाहून अनेकजण थक्क झाले. त्यामुळे त्याा लवकरात लवकर भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यावे, अशी मागणी क्रिकेटच्या चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, आता एका पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने एक अजब विधान केले आहे. वैभव सूर्यवंशीमुळे इतर काही खेळाडूंना लोक विसरून जातील, असं तो म्हणाला आहे.

वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक

पाकिस्तानाच वेगवान गोलंदाज तनवीर अहमद यांनी वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता नव्या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यांनी वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले आहे. वैभव सूर्यवंशी आगामी काळात अभिषेक शर्मा यासारख्या खेळाडूंना मागे टाकेल, अशा आशयाचे विधान तनवीर अहमद यांनी केले आहे. वैभव सूर्यवंशी जेव्हा भारतीय संघाकडून खेळेल तेव्हा त्याच्या खेळण्याची पद्धतच त्याला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवेल, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

ते दोघेही फलंदाजी करत असतील तर…

‘वैभव सूर्यवंशी जेव्हा भारताकडून खेळेल तेव्हा लोक अभिषेक शर्माला विसरून जातील. जेव्हा हे दोघेही सोबत फलंदाजी करतील तर अभिषेक शर्मा वैभव सूर्यवंशीच्या आसपासही नसेल. लोक वैभव सूर्यवंशीच्या खेळावर एवढे प्रभावित होतील की लोक अभिषेक शर्मा मैदानात खेळतोय हे विसरूनही जातील,’ असेही विधान अहमद यांनी केले.

चार सामन्यांत 200 पेक्षा जास्त धावा

दरम्यान, कोणताही वाद होऊ नये म्हणून त्यांनी नंतर एखादा खेळाडू एवढा जास्त काळा यशस्वी ठरेल, याबाबत अंदाज लावणेही तसे मुश्कील आहे, असेही म्हटले. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने अवघ्या चार सामन्यांत 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आरसीबीविरोधात खेळताना त्याने अवघ्या 26 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्स या संघातील त्याचे स्थान खूपच बळकट झाले आहे. त्यामुळे आगामी सामन्यांत तो काय कमाल करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
  • देशाची दुसरी वंदेभारत स्लीपर या मार्गावर धावणार, या दोन महानगरांना जोडणार
  • शेतकऱ्यांना कांद्याने रडवले, खिशाला मोठा कात्री, दर कमी होण्यामागे कारण काय?
  • IPL 2026 स्पर्धेत केकेआरची पराभवाची मालिका संपणार! 18 कोटींचा खर्च उपयोगी पडणार
  • गुलाबी सूटमध्ये प्रिती झिंटाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in