• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वेगवेगळ्या मद्यांसोबत आईस्क्रीमचे हे 5 प्रकार ट्राय करतात लोक, काय आहे हा विचित्र ट्रेंड ?

February 1, 2026 by admin Leave a Comment


जेव्हा एखादा पदार्थ टेस्टी करण्यासाठी लोक नवनवे एक्सपिरिमेंट करत असतात. अनेकदा हे प्रकार शरीराला नुकसानदायक असून शकते. याच प्रकारे अल्कोहोल लव्हर्स देखील ड्रींक बाबत नवनवीन प्रयोग करत असतात. मग त्याने आरोग्याला नुकसान होत असले तरी बेहत्तर. भारतीय लोक जास्त करुन ड्रींक्स सोबत सॉल्टेड शेंगदाणे पासून चिवडा, फरसाण, भजी सारखे पदार्थ चकणा म्हणून खाणे पसंद करतात. परंतू काही जण हा प्रयोग डेझर्ट्स आणि आईस्क्रीम बाबतही करत असतात. हे ऐकणाऱ्यांना विचित्र वाटेल. अनेक जण अल्कोहोलिक ड्रिंक्ससोबत आईस्क्रीम देखील मिक्स करत असतात.

अल्कोहोल संदर्भात गर्व्हमेंट हेल्थ डिपार्टमेंट्स पासून डॉक्टर्स देखील सावधान करत असतता. कारण मद्य कोणतेही असो ते शरीरासाठी नुकसान दायक असते. तरी मद्याचा खप सर्वाधिक होत असतो. दारु सोबत अनेक लोक नवनवे प्रयोग करत असतात. वेगवेगळे ड्रिंक्स मिक्स करुन पिणे, किंवा युनिक प्रकारे चाकणा टेस्ट करणे, आता तर ड्रिंक्स सोबत डेझर्ट आणि आईस्क्रीम देखील लोक टेस्ट करत आहेत. असे 5 ड्रिंक्स आहेत ज्यांचे कॉम्बिनेशन वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम सोबत केले जाते.

रोझ वाईन सोबत कॉम्बिनेशन

वाईनचे अनेक ब्रँड आणि वेगवेगळ्या चवीचे प्रकार अनेक लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. यात एक वाईन रोझ वाईन होय.यासोबत स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मिक्स केली जाते. ज्यामुळे यात एक फ्रुटी आणि लाईट क्रिमी फ्लेवर समाविष्ट होतो.

व्होडका कोणते आईस्क्रीम?

भारतासह अनेक देशात व्होडका पिणे पसंद केले जाते. खास करुन क्लब्स आणि पार्टीदरम्यान ही दारु जास्त ऑफर केली जाते. जर या सोबत जर आपण चाकणाच्या प्रयोगाची चर्चा केली तर मँगो आईस्क्रीम मिक्स केली जाते. ज्यामुळे एक लाईट आणि रिफ्रेशिंग टेस्ट मिळते.

व्हाईट रम सोबत आईस्क्रीम

भारतीय लोकांत अंम्बर रंगाची रम खूपच प्रसिद्ध आहे.कारण हीची चव खूपच व्हायब्रंट असते. म्हणून लोक हिचे कॉकटेल बनवून देखील पितात. हिवाळ्यात लोक रम जास्त पितात. आता व्हाईट रम देखील लोकांना आवडत असते. या रम सोबत लिची आईस्क्रीमचे कॉम्बिनेशन क्रिएट केले जाते, जे हिला ओव्हरपॉव्हरिंग होण्यापासून वाचवते.

Different Type Of Alcohol Combo

Different Type Of Alcohol Combo

आयरिश व्हिस्की

अनेक मद्यपींना आयरिश व्हिस्की आवडते. कारण हीची चव स्कॉच व्हिस्कीच्या तुलनेत थोडा कंफर्ट असतो. याची टेस्ट थोडीसी स्मोकी आणि मातीसारखी असते. ज्यास बॅलन्स करण्यासाठी यात आता कॉफीचे आईस्क्रीम मिक्स करतात,त्यामुळे ते तिला आणखी बोल्ड, व्हायब्रंड टेस्ट देण्याचे काम करते.

gin सोबत आईस्क्रीम

जीन ही त्या लोकांत प्रसिद्ध आहे जे क्लासिक सोबत फ्रेश आणि हर्बल टेस्टवाली ड्रिंक घेणे पसंद करतात. वा ज्यांना कॉकटेल जास्त पसंद असते. हार्ड ड्रींकच्या तुलनेत हीची नशा थोडी कमी असते. जर तुम्ही दारु पित असाल आणि व्हेनिला चव तुम्हाला आवडत असेल तर हे कॉम्बिनेशन ट्राय करु शकता. Gin सोबत व्हेनिला आईस्क्रीमची चव भन्नाट लागते.

( डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती दारुच्या व्यसनाचे समर्थन करण्यासाठी दिलेली नाही. दारु पिणे हे आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. या लेखाचा उद्देश्य केवळ आजच्या काळात अन्नपदार्थ आणि मद्याचे चित्रविचित्र प्रयोग कसे सुरु आहे याची माहिती देणे आहे. )

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Railway booking fare : जर संपूर्ण रेल्वेच बुक करायची असेल तर किती पैसे लागतात? तुम्ही अख्खी ट्रेन भाड्याने घेऊ शकता का?
  • U19 World Cup 2026 : सेमी फायनलसाठी 4 संघ फिक्स, टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?
  • Vastu Shastra : कोणत्या दिशेचं घर असतं सर्वात शुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • 150 वेळा केला बदल, बनवण्यासाठी लागली 2 वर्षे, बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं हे गाणं, 65 वर्षांपूर्वी आलेला 1 कोटी खर्च
  • Weather Update : महाराष्ट्राच्या या भागासह 11 राज्यांवर अवकाळी पावसाचे संकट, IMD कडून अलर्ट जारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in