• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विश्वासच मोडला..; एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपांनंतर थलपती विजय-तृषा एकत्र, चाहत्यांना बसला धक्का!

March 6, 2026 by admin Leave a Comment


साऊथ सुपरस्टार थलपती विजयवर पत्नी संगीताने विवाहबाह्य संबंधाचा आरोप करत कोर्टात घटस्फोटासाठी याचिका केली होती. त्यानंतर काही दिवसांतच विजय ‘एजीएस’ या चित्रपटाचे निर्माते कलपथी सुरेश यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत येऊन सर्वांचं लक्ष वेधलं. या रिसेप्शन पार्टीमध्ये विजय आणि तृषाला एकत्र पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण पत्नी संगीताने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर विजय आणि तृषा यांचीच सर्वाधिक चर्चा होती. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. रिसेप्शनमध्ये पार्टीमध्ये विजय आणि तृषा एकत्रच पोहोचले होते. यावेळी विजयच्या हातात पुष्पगुच्छ होते, तर तृषा इतर पाहुण्यांची गळाभेट घेताना आणि हस्तांदोलन करताना दिसली.

विवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी विजय आणि तृषाला एकत्रच मंचावर गेले आणि त्यांनी सोबत फोटोसुद्धा क्लिक केला. यावेळी मंचावर विजय आणि तृषा बाजूबाजूलाच उभे होते. त्यानंतर ते कार्यक्रमातून एकत्रच बाहेर पडले. चेन्नईमध्ये हा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विजयने बेज रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची धोती नेसली होती. तृषाने बेज आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

पहा व्हिडीओ-

செம ஸ்மார்ட் இருக்க அண்ணா நீ @actorvijay 🫶#ThalapathyVijay𓃵 #TVKVijay pic.twitter.com/NyQMwmdS0v

— Sunil-TVK ❤💛 (@vijaysunil012) March 5, 2026

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, आमचा विश्वास मोडलास’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे तर आता अतिच झालं.. दोघांनीही थोडा विचार करायला हवा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. विजयची पत्नी संगीताने त्याच्यावर एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. गेल्या दोन वर्षांपासून विजय आणि त्याची पत्नी वेगळे राहत आहेत. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान विजयचा मुलगा जेसन संजय याने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

संगीता सोरनलिंगमने 24 फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात विजयशी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यात तिने विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत तिने असाही दावा केला आहे की विजयने तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि आर्थिक सुरक्षेवर मर्यादा आणल्या आहेत. संगीतानेही याचिकेत असंही म्हटलं आहे की ज्या अभिनेत्रीसोबत विजयचे विवाहबाह्य संबंध आहेत, ती त्याच्यासोबत सोशल मीडियावर सतत आपले फोटो पोस्ट करत होती. यामुळे तिला आणि मुलांना सातत्याने अपमान सहन करावा लागला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Hormuz Crisis : जगाला दणका देणाऱ्या इराणने हॉर्मुज ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांकडून टोलपोटी आतापर्यंत किती लाख डॉलर्स वसूल केलेत?
  • तुरटीचा फक्त एक छोटा खडा, अन् उन्हाळ्यातील ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या
  • वायफाय देखील तुमचे भाग्य उजळवू शकतो, फक्त राउटर बसवताना या गोष्टी ठेवा लक्षात
  • Hormuz Crisis : युद्ध विरामानंतरही जग हादरलं, होर्मुजच्या सामुद्रधुनीत भयानक संकट, थेट जहाजच…
  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in