• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विवाहित दिग्दर्शकासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीने उद्ध्वस्त केलं स्वतःचं आयुष्य… एक रात्रीत इंडस्ट्रीतून गायब झाली

February 4, 2026 by admin Leave a Comment


झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड यश मिळवलं… पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरवर पोहोचलेल्या आणि एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री आता इंडस्ट्रीमधून गायब झाल्या आहे. काही अभिनेत्रींना तर काम मिळणं देखील बंद झालं आहे. पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं आयुष्य विवाहित दिग्दर्शकामुळे उद्ध्वस्त झालं. आज अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर अभिनेत्री कामय सक्रिय आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आहे. बालकलाकार म्हणून उर्मिला हिने आयुष्याची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि एक काळ गाजवला… पण एक दिवस असा अला, जेव्हा कोणी उर्मिला हिला काम देखील देत नव्हतं.

‘रंगीला सिनेमामुळे उर्मिला हिल्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ सिनेमात देखील उर्मिलाने महत्त्वाची भूमिका निभावली. सत्या सिनेमात राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलासोबत पहिल्यांदा काम केलं होतं. त्यानंतर वर्मा यांच्या प्रत्येक सिनेमात उर्मिला झळकळी.

दरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला. बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चा एक दिवस वर्मा यांच्या पत्नी रत्ना यांच्यापर्यंत पोहोचल्या. तेव्हा रागाच्या भरात रत्ना यांनी उर्मिलाच्या कानाशिलातच लगावली असल्याची बातमी मीडियामध्ये पसरली.

त्यानंतर राम गोपाल वर्मा आणि उर्मिला कधीच कोणत्याच सिनेमात एकत्र काम करताना दिसले नाहीत. एवढंच नाही तर, राम गोपाल वर्मा आणि रत्ना यांचा घटस्फोट देखील झाला. त्यासाठी देखील उर्मिला हिला जबाबदार ठरवण्यात आलं. सर्वात धक्कादायक सत्य म्हणजे, त्यानंतर कोणत्याच दिग्दर्शकाने उर्मिला हिला कास्ट केलं आहे. तेव्हाच उर्मिला हिचं करियर संपलं.

उर्मिला मातोंडकर हिचं लग्न

उर्मिला हिच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 42 व्या वर्षी लग्न केलं. मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसीन यांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न केलं… दोघांच्या वयात देखील फार अंतर. एवंढच नाही तर, सर्वांच्या विरोधात जात दोघांनी लग्न केलं.

पण उर्मिला आणि मोहसीन यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या आठ वर्षांनंतर एकमेकांसोबत घटस्फोटचा निर्णय घेतला. सप्टेंबर 2024 मध्ये या दोघांनीही परस्पर संमतीने घेतला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in