• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांच्या पक्षाचा मोठा निर्णय, एकाच नेत्याला सगळे अधिकार; 9 तारखेला होणार मोठे खुलासे!

February 3, 2026 by admin Leave a Comment


अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाबाबत अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती असा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र अशी चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या एकत्रि‍करणाच्या चर्चेदरम्यान आता शरद पवार यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा निर्णय

गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या पक्षाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर न बोलण्याच्या सूचना प्रवक्ते, नेत्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन पवार गटाने ही सावध भूमिका घेतली आहे. आता 9 तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे संपर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रफुल्ल पटेल विलीनीकरणाबाबत काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘मी आमच्या पक्षाबद्दलच बोलणार आहे. मी कोणत्याही काल्पनिक गोष्टीवर बोलणार नाही. माझ्या परीने एवढंच सांगतो की, मी आमच्या पक्षात अजितदादांनंतर पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होतो. माझी भूमिका अजितदादांच्या सुसंगत राहिली. तेव्हाच 2023 रोजी आम्ही निर्णय केला. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. सर्व आमदार अजितदादांसोबत राहिले. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी चालली. आमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

विलीनीकरणावर चर्चा झाली नाही

पुढे बोलताना पटेल म्हणाले की, ‘अजित पवार यांनी याआधी अनेक मुलाखती दिलेल्या आहेत. विलीनीकरणाबाबत त्यांची माझ्यासोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. विलीनीकरणावर चर्चा झाली असती तर त्याबाबत आम्हाला माहिती नाही, असं होऊच शकत नाही. मी अजितदादांच्या दोन मुलाखती पाहिल्या आहेत. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्यासमोर विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. फक्त स्थानिक स्वराज्यसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती होती’ असेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली गुड न्यूज
  • WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 7 विकेटने लोळवलं
  • 2025 चा सर्वात मोठा महाबकवास चित्रपट, बघता-बघता प्रेक्षक झोपले, अभिनेत्याचा अभिनय पाहून डोके फिरेल
  • GK : भारताच्या कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दारू रिचवतात?
  • SL vs ENG : श्रीलंकेसाठी प्रतिष्ठेचा सामना, इंग्लंडला हॅटट्रिकपासून रोखणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in