• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विमानात असतं एक अत्यंत सिक्रेट बटण, चुकून दबल्यास थेट अपघात; पण नेमका उपयोग काय?

February 8, 2026 by admin Leave a Comment


Airplane Fuel Control Switch : आजकाल विमान अपघाताच्या घटनांत मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे हे अपघात घडल्याचे समोर आलेले आहे. विमानात प्रवास करताना प्रत्येक नियमाचे पालन करावेच लागते. नियमांचे पालन न केल्यास अपघात होण्याचा धोका अधिक असतो. विशेष म्हणजे वैमानिक तसेच इर क्रू मेंबरनाही हे नियम पाळावे लागतात.विमानामध्ये कॉकपीटमध्ये बरीच बटणं असतात. या प्रत्येक बटणाचा एक अर्थ असतो. चुकूनही वेगळे बटण दबल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते. आजकाल आधुनिक जेट लाईनर विमानांत फ्यूल कंट्रोल स्विच असते. हे बटणदेखील खूपच महत्त्वाचे असते. ते बटण सामान्य माणसाने दाबण्याचा प्रयत्न केल्यास अनर्थ घडू शकतो. म्हणूनच फ्यूल कंट्रोल स्विच हे कॉकपिटमध्येच सेंटर कंसोलजवळ ट्रस्ट लिव्हरच्या बरोबर खाली असते. फक्त पायलटलाच हे बटण दिसावे यासाठी हे बटण कॉकपिटमध्येच असते. सामान्य प्रवाशांना हे बटण दिसत नाही.

फ्यूल स्विचला दोन पर्याय असतात

फ्यूल कंट्रोल स्विच विमानाच्या प्रत्येक इंजिनमध्ये जाणाऱ्या इंधनावर नियंत्रण ठेवते. या बटणाला दोन पर्याय असतात. पहिला रन आणि दुसरा कट ऑफ. फ्यूल कंट्रोल स्विचवर रन हा पर्याय असेल तर विमानाच्या इंजिनला इंधनाचा पुरवठा असतो. आणि कट ऑफ हा पर्याय निवडलेला असेल तर इंजिनला मिळणारे इंधन थांबते. त्यामुळे इंजिन लगेच बंद होते. फ्यूल कंट्रोल स्विच हे एक सेफ्टी कंट्रोल स्विच आहे. वैमानिकदेखील हे बटण सहज हाताळू शकत नाही. त्याला पुल टू अनलॉक सिस्टिम असते. पायलटला या बटणाचा उपयोग करायचा असेल तर त्याला अगोदर हे बटण अनलॉक करावे लागते. कारण हे बटण चुकूनजरी चुकीच्या पद्धतीन दबले तर थेट विमानाचे इंजिन बंद पडू शकते.

प्रवाशी कॉकपिटपर्यंत पोहोचला तर काय होईल?

इंजिनच बंद पडल्यामुळे विमानाचा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळेच फ्यूल कंट्रोल या बटणाला लॉकिंग सिस्टिम असते. सामान्य प्रवाशी कॉकपिटमध्ये पोहोचला तरीदेखील त्याला हे बटण सहजासहजी अनलॉक करता येत नाही. आणीबाणीची वेळ असेल तरच वैमानिक या स्वीचचा वापर करतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई
  • Horoscope : 13 एप्रिलचा दिवस खूपच खास, 3 राशींसाठी पैशांचा दुर्मिळ योग; वाचा नशीब कसं फळफळणार?
  • IPL 2026: शुबमन गिलकडून नव्या विक्रमाची नोंद, 4000 धावा करत विराटच्या पुढे निघून गेला
  • लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला… धक्कादायक माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in