• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विमानाच्या टेकऑफ अन् लँडिंगवेळी एअर होस्टेस हात मांड्याखाली का दाबतात? खरं कारण माहितीये का?

April 5, 2026 by admin Leave a Comment


आपण आपल्या आयुष्यात एकदातरी विमान प्रवास करावा, असं अनेकांचं स्वप्न असतं. आपण बसने प्रवास करतो, एसटीने प्रवास करतो, अगदी ट्रेनने देखील अनेकदा प्रवास करतो, मात्र विमान प्रवासाची मजाच काही वेगळी असते. हजारो किलोमीटरचं अतंर आपण अगदी काही तासांमध्ये विमान प्रवासाच्या माध्यमातून सहज पार करू शकतो. विमान आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये सहज पोहचू शकतं. वेगवान प्रवास ही विमानाची ओळख आहे. मात्र विमानाचं तिकीट तुलनेनं जास्त असल्यामुळे अनेकांना आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. जे लोक नियमित विमानाने प्रवास करतात, त्या लोकांना त्याचं फार काही नवलं नसतं. मात्र जे लोक पहिल्यांदाच विमानानं प्रवास करत आहेत, अशा लोकांना या प्रवासाबाबत प्रचंड उत्सुकता असते, तसेच अनेकजण अशावेळी गोंधळून देखील जातात.

मात्र जेव्हा प्रवासी गोंधळलेले असतात, किंवा त्यांना जर एखाद्या गोष्टीची गरज असेल तर विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी एअर होस्टेस असतात. ज्या लोकांचा आयुष्यातील पहिला विमान प्रवास असतो, त्यांना अनेकदा कळत नाही की सीट बेल्ट कसा बांधायचा? विमान लँड होत असताना किंवा टेक ऑफ करत असताना नेमकं काय करायचं? अशावेळी या एअर होस्टेस या प्रवाशांना मदत करतात. मात्र तुम्ही जर कधी विमानाने प्रवास केला असेल तर एक गोष्ट नक्कीच तुमच्या दृष्टीस पडली असेल ती म्हणजे जेव्हा विमान टेकऑफ होत असतं किंवा लँड होत असतं त्यावेळी या एअर होस्टेस आपल्या सीटवर बसून आपले दोन्ही हात मांड्यांखाली दाबून ठेवतात, त्या नेमकं असं का करतात? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?

जेव्हा विमान लँड होतं किंवा टेक ऑफ घेतं त्यावेळी जर काही चूक झाली तर दुर्घटना घडू शकते, त्यामुळे अशावेळी प्रवाशांसोबतच एअर होस्टेसला देखील आपल्या सीटवर बसून सीट बेल्ट लावण्यास सांगितलं जातं. तसेच विमान लँड होताना किंवा टेक ऑफ घेताना अचानक झटका बसला तर त्यांचा तोल जाऊन त्या समोरच्या बाजूला पडू शकतात. मात्र जर त्यांनी आपले दोन्ही हात मांड्याखाली दाबलेले असतील तर अशावेळी त्यांना आपलं बॅलन्स सांभाळण्यास मदत होते. म्हणून एअर होस्टेस आपले दोन्ही हात मांड्याखाली दाबून धरतात.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त वेळ उभं राहिल्यामुळे त्यांचे पाय दुखतात, त्यामुळे जेव्हा त्या सीटीवर बसतात त्यावेळी जर त्यांनी आपले हात मांड्याखाली दाबून धरले तर त्यांना थोडा आराम मिळतो, यामुळे ब्लड सर्कुलेशन देखील सुधारते आणि पायांच्या स्नायुंना आराम मिळतो.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in