• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विधानसभेच्या सुरक्षेत मोठी गफलत, गेट तोडून कार थेट आत घुसली….

April 6, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली विधानसभेत सोमवारी सुरक्षेतील मोठी गफलत उघडकीस आली एक अनोखळी कार अचानक दिल्ली विधानसभा परिसरात घुसली. ही कार मेन गेटला ठोकर मारुन आत कॉम्प्लेक्समध्ये घुसली. त्यामुळे सुरक्षा रक्षकात एकच धावपळ उडाली. असे म्हटले जात आहे की दिल्ली विधान सभेच्या मुख्य गेटचा दरवाजा तोडून एक कार आत घुसली आणि विधानसभा अध्यक्षांच्या कारच्या जवळ काही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आली. या प्रकरणाने खळबळ उडाली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कारच्या जवळ नेमके काय ठेवण्यात आले आहे याची चौकशी केली जात आहे. तसेच ही अनोळखी कार कोणाची होती आणि त्यात कोण होते याची चौकशी केली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेत घुसणाऱ्या कारचे रजिस्ट्रेशन उत्तर प्रदेशचे असून ती कार गेट क्रमांक २ मधून जबरदस्ती आत शिरली आणि यामुळे लोखंडी गेट तुटले आहे.

 गेटवर ठेवला फुलांचा गुच्छ

या संशयित कारचा चालक विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाच्या दिशेने गेला आणि त्यांनी दरवाजाच्या गेटजवळ फुलांचा एक गुच्छ ठेवला. या घटनेने सुरक्षा यंत्रणांची धावपळ झाली. हा प्रकार सुरक्षितील मोठी चूक मानली जात आहे. अशा प्रकारे कोणतीही कार विनापरवानगी येऊ शकत नाही असे म्हटले जात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की एक तोंड झाकलेला व्यक्ती ही कार चालवत होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विधानसभा परिसरातील गेट क्रमांक २ तोडून ही कार अचानक घुसली.

येथे पोस्ट पाहा –

#WATCH | Visuals from Delhi Assembly premises after a car tried to enter the premises forcefully, breaching the security barriers.

More details are awaited. https://t.co/4DiWFGhXKm pic.twitter.com/c5KfDS6luA

— ANI (@ANI) April 6, 2026

विधानसभेला बॉम्बने उडवण्याची मिळाली होती धमकी

दिल्ली सेक्रेटेरिएटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ड्रायव्हर असेंबली स्पीकर विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाच्या दिशेने गेला आणि मागे वळण्याआधी त्याने पोर्चच्या जवळ फुलांचा गुच्छ ठेवला. या बुकेत कोणतीही संशयास्पद वस्तू नव्हती. व्हीआयपी गेटवर सीआरपीएफची सुरक्षा तैनात होती. त्यानंतर ड्रायव्हर फरार झाला. गाडीचा क्रमांक UP-26 AZ 8090 आहे.

येथे पोस्ट पाहा –

#WATCH | Visuals from Delhi Assembly premises after a car with a Uttar Pradesh registration number forcibly entered Gate No. 2, breaking the iron gate. The driver placed a bouquet there and left. The search for the vehicle is ongoing. pic.twitter.com/KoAgU4I3Q0

— ANI (@ANI) April 6, 2026

दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा तपासणी करुन त्याआधारे ड्रायव्हर आणि कारचा शोध घेण्यास सुरुवात केली. नंतर या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव सरबजीत सिंह आहे. त्याची कार रुपनगर येथून जप्त करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या घटनेला संभावित सिक्युरिटी ब्रीच म्हटले जात आहे.अलिकडेच अधिवेशन सुरु असताना दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. त्यामुळे या विधानभवनाच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे असे एका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video
  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in