• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वायफाय देखील तुमचे भाग्य उजळवू शकतो, फक्त राउटर बसवताना या गोष्टी ठेवा लक्षात

April 11, 2026 by admin Leave a Comment


आजचे युग इंटरनेटचे आहे. त्यामुळे इंटरनेट हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. शहरात असो वा खेडेगावात प्रत्येक घरात चांगले इंटरनेट मिळावा यासाठी वायफाय राउटर बसवले जात आहे. कारण यामुळे मोबाईल फोन किंवा वायफाय राउटरद्वारे इंटरनेटची सोय उपलब्ध होते. तसेच वाढत्या ऑनलाइन शिक्षण, स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही आणि वर्क फ्रॉम होमसाठी इंटरनेट आवश्यक झाले आहे. वायफाय राउटर आता बहुतेक घरांमध्ये एक उपयुक्त उपकरण बनले आहे.

मात्र आजकाल लोक तंत्रज्ञानासोबतच वास्तुशास्त्राच्या तत्त्वांकडेही लक्ष देतात. वास्तुशास्त्रानुसार घरात राउटर योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने बसवल्याने जीवनावर आणि नशिबावर परिणाम होतो. चला तर मग वायफाय राउटर बसवताना लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

वायफाय राउटर बसवताना या गोष्टी लक्षात ठेवा

राउटरची दिशा: वास्तुशास्त्रानुसार राउटर बसवताना उत्तर-पूर्व दिशा सर्वोत्तम आहे. या दिशेला ईशान कोन (ईशान्य कोपरा) म्हणतात. ही दिशा ज्ञान, शांती आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. या दिशेत राउटर बसवल्याने घरात समृद्धी आणि स्पष्टता येते.

अशातच ईशान्य दिशेत जागा उपलब्ध नसल्यास राउटर बसवण्यासाठी पूर्व दिशा देखील एक चांगला पर्याय मानली जाते. ही दिशा नवीन सुरुवात आणि प्रगतीचे प्रतीक आहे. या दिशेत राउटर बसवल्याने करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. नैऋत्य दिशेत राउटर ठेवू नये.

राउटरची उंची: वास्तुशास्त्रानुसार कोणतेही विद्युत उपकरण जमिनीवर ठेवणे टाळावे. त्यामुळे राउटर नेहमी किंचित उंच ठिकाणी ठेवावा. तो भिंतीवर, टेबलावर किंवा रॅकवर ठेवल्याने ऊर्जेचा प्रवाह सुधारण्यास मदत होते.

स्वच्छ मोकळी जागा: राउटरच्या आजूबाजूला कोणतीही घाण किंवा जड वस्तू नसाव्यात.

या ठिकाणी वायफाय राउटर ठेवणे टाळा: तुमचा राउटर बेडरूममध्ये ठेवणे टाळा . तसेच देवघरामध्ये किंवा स्वयंपाकघरात ठेऊ नका. तुमचा राउटर पाण्याच्या स्रोतांपासून आणि जड धातूच्या वस्तूंपासून दूर ठेवा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO
  • दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in