• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘वडापाव गर्ल’ला पतीनेच फसवलं? रडत-ओरडत गंभीर आरोप; हाय-व्होल्टेज ड्रामा पाहून नेटकरी चक्रावले

February 2, 2026 by admin Leave a Comment


Vada Pav Girl fight with Husband: वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी, ती तिच्या दुकानामुळे किंवा कोणत्याही रिअॅलिटी शोमुळे चर्चेत नाही. तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. चंद्रिका हिने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. चंद्रिका हिने इन्स्टाग्राम नवऱ्यासोबत भांडताना काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सध्या चंद्रिका हिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

चंद्रिका दीक्षित हिने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती मोठमोठ्याने ओरडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये चंद्रिका म्हणते, नवऱ्याने तिची फसवणूक केली आहे. एवढंच नाही तर, तिने फोनमध्ये नवऱ्याचे अन्य मुलीसोबत चॅट आणि फोटो देखील दाखवले आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chandrika Gera (@chandrika.dixit)

 

एका व्हिडीओमध्ये तर चंद्रिका डोक्याला हात लावून रडताना देखील दिसत आहे. ‘गेल्या 2 महिन्यांपासून काय काय सहन करत आहे, हे फक्त मलाच माहिती आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे, पण मी काहीच बोलू शकले नाही. मी दिवस – रात्र काम करत आहे. मुलाचा सांभाळ करत आहे… दुकानासोबतच सर्वकाही मी एकटी बघत आहे.’

पुढे नवऱ्याला चंद्रिका म्हणाली, ‘मी काम करते आणि तू हे सगळं करत आहेस… जी मुलगी दिवस तुझ्या भोवती फिरत आहे… माझा नवरा… माझं घर… माझं प्रेम… पण माझं काय आहे?’ त्यानंतर चंद्रिका हिने चॅट देखील दाखवले… शिवाय नवऱ्याने अन्य महिनेसोबत असलेले रोमँटिक फोटो देखील दाखलवे. पण तिने महिलाचा चेहरा दाखवलेला नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chandrika Gera (@chandrika.dixit)

 

चंद्रिका हिचे व्हिडीओ आणि अवस्था पाहिल्यानंतर अनेकांनी वडापाव गर्लचं समर्थन केलं आहे. तर अनेकांनी व्हिडीओ स्क्रिपडेट असल्याचं सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर चंद्रिका हिचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओ पोस्ट करत चंद्रिका हिने ‘पुरावे माझ्याकडे आहेत…’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik Crime : Whatsapp ग्रुप, फ्लॅट, लैंगिक शोषण आणि…तरूणींच्या धर्मांतरासाठी असे रचायचे षडयंत्र, वाचून तुम्हीही हादराल
  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in