• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेले ‘या’ 5 प्रकारच्या सॅलड्सचे करा सेवन

March 21, 2026 by admin Leave a Comment


बदलत्या जीवशैलीमुळे अनेकांचे वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रोजच्या शारीरिक हालचालींव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. जर या दोन गोष्टी योग्यरित्या फॉलो केल्या तर वजन लवकर कमी करता येते. वजन कमी करण्यात प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात, मात्र कॅलरीचे सेवन मर्यादित ठेवणे किंवा आपले शरीर जितक्या कॅलरी खर्च करू शकते तितक्याच कॅलरी घेणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी सॅलड्स विशेषतः फायदेशीर ठरतात. कारण त्यांमध्ये कॅलरी कमी असून फायबर भरपूर असते. तसेच सॅलडच्या सेवनाने विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील शरीराला मिळत असतात. तर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर आजच्या लेखात आपण अशा पाच प्रकारच्या सॅलड्सची रेसिपी आणि वजन कमी करण्यास कसे उपयुक्त ठरतात ते जाणून घेऊयात.

सॅलडचा फायदा हा आहे की ते बनवायला जास्त वेळ लागत नाही. तसेच सॅलडमध्ये भरपूर पाणीही असते, ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. चला वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलड

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या आहारात मोड आलेल्या धान्यांच्या सॅलडचा समावेश करा. मोड आलेले मूग, मोड आलेले काळे चणे आणि शेंगदाणे एकत्र करा. त्यात टोमॅटो, कांदे आणि काकडी यांसारख्या भाज्या बारीक चिरुन मिक्स करा. आता यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून हे तुमचे प्रथिनयुक्त सॅलड तयार होईल.

ग्रीन सॅलड बनवा

ग्रीन सॅलड बनवण्यासाठी यामध्ये काकडी, मुळा, टोमॅटो, लेट्यूस, गाजर, ब्रोकोली हे सर्व बारीक चिरुन घ्या. त्यात पुदिन्याची पाने देखील मिक्स करा. लिंबाचा रस, काळी मिरी आणि काळे मीठ टाकूल मिश्रण एकत्र मिक्स करा. आता या सॅलडवर थोडे ऑलिव्ह तेल टाका. अशा प्रकारे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अनेक अँटिऑक्सिडंट्स असा पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेला एक चविष्ट ग्रीन सॅलड आहारात समावेश करा.

उच्च प्रथिनयुक्त सॅलड

तुम्ही पनीर किंवा टोफू यापासून देखील सॅलड बनवू शकता. पनीरमध्ये फॅटचे प्रमाण थोडे जास्त असते, तर टोफूमध्ये फॅट कमी असते आणि ते प्रथिनांनीही भरपूर असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार दोन्हीपैकी एक निवडू शकता. सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे ऑलिव्ह तेल पसरवा. त्यात 100 ग्रॅम पनीर किंवा टोफू परतवून घ्या. ते एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात मूग, चणे किंवा क्विनोआ यांसारखी मोड आलेली धान्ये टाका. त्यात काही चिरलेल्या भाज्या आणि लिंबू-मिरचीचे ड्रेसिंग टाकून चविष्ट सॅलडचा आस्वाद घ्या.

ब्रोकोली-चणे सॅलड

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्रोकोली आणि चण्यांचे सॅलड बनवू शकता. चणे उकडून घ्या आणि त्यात ब्रोकोली हलकी वाफवून घ्या. कांदा बारीक चिरा. तसेच शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. सर्व बारीक चिरलेल्या भाज्या एकत्र मिक्स करा, त्यावर थोडे ऑलिव्ह तेल टाका आणि मग मीठ व काळी मिरी यांसारखे नेहमीचे मसाले टाका. फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांनी समृद्ध असलेले सॅलड तयार आहे.

दह्यासोबत प्रथिनयुक्त सॅलड

तुम्हाला जर दुपारच्या जेवणात सॅलडचा समावेश करायचा असेल, तर प्रथिनयुक्त योगर्ट सॅलड उत्तम आहे. सकाळी दही एका कापडात बांधून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. आता हे सॅलड बनवण्यासाठी त्यात प्रथम, काकडी, गाजर यांसारख्या काही भाज्या आणि लेट्यूसची काही पाने लांब चिरून घ्या. आता एका भांड्यात दही फेटून घ्या. त्यात चिरलेल्या भाज्या आणि मोड आलेले मुग मिक्स करा. तुम्ही 50 ग्रॅम पनीर देखील त्यात मिक्स करू शकता. सैंधव मीठ आणि बारीक पुड केलेली काळी मिरी टाकून चवीनुसार मसाला टाका. तुमचे चविष्ट सॅलड तयार आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in